Tue, Jul 16, 2019 11:46होमपेज › Aurangabad › जायकवाडी धरणावर बाँम्ब असल्याची अफवाच

जायकवाडी धरणावर बाँम्ब असल्याची अफवाच

Published On: Sep 11 2018 6:51PM | Last Updated: Sep 11 2018 6:53PMऔरंगाबाद : प्रतिनिधी 

जायकवाडी धरणाच्या मुख्य सुरक्षा भिंतीजवळ बॉम्‍ब ठेवल्याचे आज सकाळी आढळून आल्‍यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी तत्काळ पोलिस बंदोबस्त तैनात करण्‍यात आला. औरंगाबाद येथील बॉम्‍ब शोधक व नाशक पथकाला बोलावण्‍यात आले होते. नाथसागरच्या थेट भिंतीला खेटून पत्र्याच्या डब्‍यात बॉम्बसदृश्‍य वस्तू असल्याचा संशय पोलिस निरीक्षक चंदन इमले यांनी व्यक्त केला आहे. जायकवाडी धरणावर बाँम्ब असल्याची अखेर अफवाच ठरली असून पैठण पोलिसांच्या हा सरावाचा भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.