Tue, Jul 16, 2019 21:50होमपेज › Aurangabad › पैठणच्या 'संत एकनाथ'चे संचालक मंडळ बरखास्त

पैठणच्या 'संत एकनाथ'चे संचालक मंडळ बरखास्त

Published On: Apr 23 2018 2:37PM | Last Updated: Apr 23 2018 2:37PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ सहकारी संस्थेच्या सहनिबंधक तथा प्रादेशिक साखर सहसंचालकांनी बर्खास्त केले. संचालक मंडळ बरखास्‍त केल्‍यानंतर प्रशासक म्हणून विलास सोनटक्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शासकीय रकमा भरण्यास संचालक मंडळ अकार्यक्षम असने आणि बेकायदेशीररित्या अन्य कारखान्यास सहकारी कारखाना चालवण्यास देण्याचा ठराव घेणे, या गोष्‍टी चौकशीत सिद्ध झाल्‍या आहेत. त्यानुसार ही कार्रवाई करण्यात आली आहे. 

सहकारी संस्थेच्या सहनिबंधक तथा प्रादेशिक सहसंचालिका निलिमा गायकवाड यांनी हे आदेश काढले. धोंडीराम एकनाथ एरंडे आणि विक्रम किशनराव घायाळ यांनी  21 जानेवारी  रोजी ऍड. दीपक चौहान यांच्या मार्फत तक्रार केली होती.

Tags : sant eknath sugar factory paithan, Board