Thu, Apr 25, 2019 11:27होमपेज › Aurangabad › शंभर कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

शंभर कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Published On: Jul 03 2018 1:50AM | Last Updated: Jul 03 2018 12:08AMवाळूज महानगर : प्रतिनिधी

फ्लो मीटर उत्पादनाच्या क्षेत्रात जगात अग्रेसर असलेल्या अँड्रेस अँड हाऊजर (इंडिया) कंपनीने वाढती मागणी तसेच नवीन बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करत विस्तारित प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. 

वाळूज येथील अँड्रेस अँड हाऊजर कंपनीच्या 100 कोटींच्या विस्तारित प्रकल्पाचे भूमिपूजन सोमवारी अँड्रेस हाऊजर फ्लोटेक एजीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बर्नड जोसेफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कंपनीचे अध्यक्ष तथा संचालक कुलाथू कुमार, स्वित्झलर्र्ंडच्या  दूतावास ब्रुहिन, प्रकल्पप्रमुख जयेंद्र भिरुडे, उल्हास गवळी, संदीप नागोरे, हिना देसाई, कैलास देसाई, नरेंद्र कुलकर्णी, ए. श्रीराम, मोहिनी केळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. ग्रीन कन्सेप्ट आणि एनर्जी एफिशियंट असलेल्या  विस्तारित प्रकल्पाचे बांधकाम 12 हजार स्क्वेअर मीटर असून या इमारतीवर रुफ टॉप सोलार पॉवर युनिट, रेन वॉटर हार्वेस्टिंग आदी सुविधा केल्या जाणार आहेत.

औरंगाबाद शहराच्या वेगाने होत असलेल्या औद्योगिकरणाच्या वाटचालीतील हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प ठरणार असून स्थानिक युवक तसेच लघुउद्योजकांना मोठ्या संधी प्राप्‍त होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक चितळे यांनी केले. स्वित्झलर्र्ंड येथील अँड्रेस हाऊजर फ्लोटेक एजी या कंपनीची उपकंपनी असलेली अँड्रेस हाऊजर फ्लोटेक (इंडिया) कंपनी देशातील एक अग्रणी आणि अत्याधुनिक प्रकल्प असून यामध्ये फ्लोमीटरची तपासणी, चाचणी आणि मोजमाप करण्याची जागतिक उपकरणे बनविली जातात. या उत्पादन प्रकल्पातून आशिया आणि आफ्रिकेतील फ्लो मीटरच्या बाजारपेठेतची फ्लोमीटर आणि सुट्या भागांची गरज पूर्ण केली जाते. औरंगाबाद प्रकल्पामध्ये तयार होणारी उत्पादने ही कंपनीच्या एकूण उत्पन्‍नाच्या 70 टक्के उत्पन्‍न निर्यातीच्या माध्यमातून मिळवून देते.