Tue, Nov 13, 2018 10:09होमपेज › Aurangabad › भरारी पथकांनी पकडले ५०५ कॉपी बहाद्दर

भरारी पथकांनी पकडले ५०५ कॉपी बहाद्दर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विविध पदवी अभ्यासक्रमांची पदवी परीक्षा 10 नोव्हेंबरपासून सुरू असून परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी नेमलेल्या भरारी पथकांनी औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत 505 कॉपी बहाद्दरांना पकडले आहे. 

पहिल्या दिवसाचा गोंधळ वगळता परीक्षा सुरळीत सुरू आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांत 3 लाख 5 हजार विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. परीक्षेत गैरप्रकार होऊ नये, यासाठी परीक्षा विभागाने 17 भरारी पथके नेमली असून त्यांनी विविध परीक्षा केंद्रांना भेटी देऊन गैरप्रकार करताना आढळलेल्या 505 विद्यार्थ्यांना पकडले. औरंगाबाद जिल्ह्यात 244 कॉपीबहाद्दर हाती लागले. बीड, उस्मानाबाद येथे अनुक्रमे 86 आणि 175 जणांना कॉपी करताना पकडण्यात आले. जालना जिल्ह्यातील कॉपीबहाद्दरांची संख्या समजू शकली नाही. दरम्यान, महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांची सत्र परीक्षा 27 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.