Fri, Jul 19, 2019 23:17होमपेज › Aurangabad › सजग राहा, तुमची चिमुकली कायम असुरक्षित

सजग राहा, तुमची चिमुकली कायम असुरक्षित

Published On: Apr 23 2018 8:02AM | Last Updated: Apr 23 2018 1:20AM औरंगाबाद : सतीश अन्वेकर

कठुआ, उन्‍नाव,  सूरतमध्ये अल्पवयीन मुलींवर नराधमांनी अत्याचार करून त्यांची निर्घृण हत्या करत माणुसकीला काळिमा फासला. या घटनांमुळे संपूर्ण देश ढवळून निघाला, जगात भारताची नाचक्‍की झाली. सजगतेची सामाजिक जाणीव होऊनही तुमची चिमुकली कायम असुरक्षित आहे.दै. पुढारी प्रतिनिधिनीने शाळांमध्ये जाणार्‍या मुलींचा घर ते शाळा हा प्रवास तसेच घराबाहेर एकटे अथवा पालकांसमवेतही बाहेर पडणार्‍या कळ्या असुरक्षितच असल्याचे अनुभवले. इयत्ता पहिली ते नववीतील मुलींना कायद्याच्या भाषेत अल्पवयीन समजले जाते. स्पर्धा, अभ्यास, शिकवण्याचा भडिमार अशा गर्तेत राहणार्‍या चिमुकलींना नकोसा किटाळवाणा स्पर्श, बिकट हास्य, वखवखलेल्या नजरांना सामोरे जावे लागते.

...असा आला अनुभव

औरंगपुर्‍यातील संस्थेत नववीत शिकणारी मुलगी सकाळी 7 वाजता  रिक्षाने शाळेस निघाली. रिक्षावाले काका 55 वर्षांचे. ते मुलीला पाहताच खुलले. मुलगी चुपचाप रिक्षात बसली. त्यांनी तिला त्यांच्या शेजारी पुढे बसण्यास सांगितले. अगं मागे मुलांत कशाला बसते, असा प्रश्‍न केला. ही कन्या हतबलतेेने काकांच्या शेजारी बसली, मात्र   ज्यांच्यावर तिचे पालक व मुलीने विश्‍वास दर्शविला ते काका नाहक तिच्या अंगाला स्पर्श करताना दिसले.दुसरी घटनाही पालक, समाज, शिक्षकांना चिंतीत करणारी. टीव्ही सेंटर येथून सकाळचीच शाळा असलेली सातवीची मुलगी रिक्षात बसल्यावर 18 वर्षीय रिक्षाचालक तिच्याशी दररोजच जवळीक अथवा लगट करण्याच्या प्रयत्नात दिसला. मुलगी शाळेतून त्याच्या रिक्षातून येईपर्यंत तो कुटुंबातील सदस्यांसारखी आपुलकी दाखवत बळेच  हास्य करत शेकहॅण्ड करण्याचा प्रयत्नात दिसला.

शाळेच्या बाहेर पडणे म्हणजे जेलच

सुरक्षिततेसाठी पालक व रिक्षावाले आल्यावरच अनेक शाळा मुलींना सोडतात. दुपारची शाळा व सायंकाळी शिकवणी असलेल्या कन्या व पालकांना सुरक्षिततेचे अधिक भय जाणवते.

Tags : Aurangabad,  aware, your, girls, permanently, insecure