Fri, Sep 20, 2019 04:45होमपेज › Aurangabad › मतमोजणी बॅडमिंटन हॉलमध्ये

मतमोजणी बॅडमिंटन हॉलमध्ये

Published On: Dec 03 2017 2:39AM | Last Updated: Dec 03 2017 2:00AM

बुकमार्क करा

औरंगाबाद ः प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा पदवीधर गणाच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होणार आहे. मतमोजणी 7 डिसेंबर रोजी क्रीडा विभागाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये 25 टेबलवर होईल, अशी माहिती कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी दिली. अंबडचे मतदान केंद्र वाढल्यामुळे आता मतदान केंद्रांची संख्या 56 व बुथची संख्या 84 झाली आहे, असे त्या म्हणाल्या. यासाठी 85 केंद्राध्यक्ष आणि 247 मतदान अधिकार्‍यांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिस कर्मचारी तैनात राहणार आहेत. मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण केले जाईल. उमेदवारांना ओळखपत्रे देण्यात येणार आहेत, असेही त्या म्हणाल्या. 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex