Sat, Dec 14, 2019 05:33होमपेज › Aurangabad › औरंगाबादेत कृत्रिम पावसासाठी रसायनांसह विमानाचे उड्डाण

औरंगाबादेत कृत्रिम पावसासाठी रसायनांसह विमानाचे उड्डाण

Published On: Aug 09 2019 6:23PM | Last Updated: Aug 09 2019 5:16PM
औरंगाबाद :  प्रतिनिधी

एकीकडे पश्चिम महाराष्‍ट्रातील कोल्‍हापूर, सांगलीमध्ये पावसाने हाहाकार माजवला असताना दुसरीकडे मराठवाड्‍यात दुष्‍काळ पडला आहे. त्‍या पार्श्वभूमीवर अवर्षणग्रस्त मराठवाड्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी आज (दि.9) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास रसायनांसह विमानाने चिकलठाणा विमानतळावरून उड्डाण केले. 

आज गुरुवारी सी-डॉप्लर रडार कार्यान्वित करण्यात आले आणि आयएमडीचे माजी शास्त्रज्ञ डॉ. जी. आर. कुलकर्णी, हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी तंत्रज्ञांना मार्गदर्शन केले. त्यानंतर आज पाणीदार ढगांवर रसायने फवारून पाऊस पडण्याचा प्रयोगाची चाचणी घेण्यात आली. हे विमान औरंगाबाद शहराच्या पश्‍चिम भागात गेले असून, 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या ढगांवर मेघबीजारोपन करणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

मात्र, त्यामुळे किती मि मी पाऊस झाला, हे अद्याप कळू शकलेले नाही. विमानाच्या उड्डाणा प्रसंगी चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर शास्त्रज्ञासह महसूल उपायुक्‍त सतीश खडके, उपजिल्हाधिकारी मृणालिनी सावंत-निंबाळकर यांची उपस्थिती होती.