Tue, Apr 23, 2019 13:33होमपेज › Aurangabad › पाचशे रूपयांसाठी रिक्षाचालकाचा खून

पाचशे रूपयांसाठी रिक्षाचालकाचा खून

Published On: Jan 01 2018 11:41AM | Last Updated: Jan 01 2018 11:41AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

नशा करीत बसलेल्या दोन तरुणांना  चाकूचा धाक दाखवून पाचशे रुपये व मोबाइल हिसकावणार्‍या रिक्षाचालक मित्राचा दोघांनी निर्घृण खून केला.  एकाने घट्ट पकडून दुसर्‍याने  कू, वस्तर्‍याचे सपासप वार केले. जमिनीवर कोसळल्यानंतर सिमेंटच्या गट्टूने चेहर्‍याचा आणि डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा केला. नंतर सलीम अली सरोवरातील पाण्यात बुडविले  आणि बेल्टने गळा  आवळून बाभळीला लटकवून ठेवले.

30डिसेंबरच्या रात्री 9 वाजता तब्बल अर्धा  तास हा थरार चालला. फेरोज खान फारूख खान (22, रा. रोजाबाग) असे मृत  रिक्षाचालकाचे नाव  आहे. या प्रकरणी शेख सर्फराज शेख सांडूऊर्फ शफ्फू (18) आणि शेख आदील  शेख रफिक ऊर्फ लंगडा (19, दोघे रा. रोजाबाग) या दोघांना सिटीचौक लिसांनी  अटक केली. मृत फेरोज खान आणि आरोपी शेख सर्फराज व शेख आदिल हे एकमेकांचे मित्र आहेत.

शनिवारी (दि. 30) रात्री सर्फराज व आदिल हे सलीम अली सरोवराच्या मागील जूच्या बाभूळवनात नशा करीत बसले होते. तेथे फेरोज खान आला. त्याने दादागिरी करून सर्फराजच्या खिशातील मोबाइल व पाचशे रुपये हिसकावले. त्यामुळे त्यांच्यात  द झाला. फेरोज खानने सर्फराजच्या हातावर चाकूने वार केला. आधी केली आरोपींना अटक माहिती मिळताच, सहायक पोलिस निरीक्षक शैलजा जानकर-दराडे,  कॉन्स्टेबल देविदास खेडकर यांच्यासह डीबी पथकाने तिकडे धाव घेतली. मिळालेल्या माहितीवरून दोन्ही आरोपींना अटक केली.   

अर्धा तास झटापट... अन् फेरोज कोसळला

फेरोज खान याच्याशी वाद झाल्यावर शेख सर्फराज व शेख आदिल यांनी  त्याला संपविण्याचे ठरविले. त्यामुळे ते दोघे परत घटनास्थळी आले. यावेळी एकाने फेरोजला घट्ट  पकडले तर दुसर्‍याने त्याच्या गळ्यावर वस्तरा  आणि चाकूने सपासप वार केले. यात फेरोज रक्‍तबंबाळ झाला. तो जमिनीवर कोसळल्यानंतर रागाच्या भरात आरोपींनी सिमेंटच्या गट्टूने अक्षरक्षः त्याच्या  डोक्याचा चेंदामेंदा केला. त्यानंतर त्याच्या कमरेचा बेल्ट सोडून फेरोजचा गळा आवळला. त्याला सलीम अली सरोवराच्या पाण्यात ढत नेले. पाण्यात बुडवून बेल्टने बाभळीला लटकविले. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेले.