Sat, Nov 17, 2018 20:37होमपेज › Aurangabad › औरंगाबाद सेक्स रॅकेट :‘स्पा’मध्ये गर्लफ्रेंड असल्याचा बनाव

औरंगाबाद सेक्स रॅकेट : ‘स्पा’मध्ये गर्लफ्रेंड असल्याचा बनाव

Published On: Dec 11 2017 9:09AM | Last Updated: Dec 11 2017 9:09AM

बुकमार्क करा

औरंगाबाद ः प्रतिनिधी

प्रोझोन मॉलमधील अनंतरा आणि दी स्ट्रेस हबफ या दोन्ही फॅमिली स्पाफमध्ये पोलिसांनी छापा मारला तेव्हा सर्वात प्रथम तेथे बसलेल्या शशांक यशदीप खन्ना (28, रा. मालाड, मुंबई) याला पकडले. पोलिसांना पाहताच पाचावरण धारण बसलेल्या खन्नाची बोलती बंद झाली, तरीही त्याने स्पामध्ये गर्लफ्रेंड आल्याची थाप मारून सुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, आतून आलेल्या एका सहायक व्यवस्थापकाने
खन्ना मुख्य व्यवस्थापक असल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली.

औरंगाबाद शहर पोलिसांच्या विशेष पथकाने गुरुवारी प्रोझोन मॉलमधील अनंतरा व दी ट्रेस हबफ या दोन्ही फॅमिली स्पामध्ये मसाज व कटिंगच्या नावाखाली सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या कारवाईत पोलिसांनी देहविक्री करणार्‍या थायलंडच्या नऊ व दोन स्थानिक तरुणी, तसेच ‘स्पा’चा मुख्य व्यवस्थापक शशांक खन्नासह या कृत्यात सहभागी असलेले स्पाचे कर्मचारी सुनील कचरू नवतुरे (27, रा. मिसारवाडी), शेख तौफिक शेख अफसर (23, रा. बायजीपुरा, संजयनगर), राहुल माणिकराव नलावडे (28, रा. मिसारवाडी) या 14 जणांसह चार ग्राहकांना अटक केली होती. व्यवस्थापक असलेला खन्ना मुंबईत राहतो; शहरात आल्यावर तो थायलंडच्या तरुणींना सोय करून दिलेल्या आलिशान पाच बीएचकेच्या फ्लॅटमध्ये राहत असल्याचेही समोर आले. विशेष म्हणजे, पोलिसांनी
पकडले तेव्हा त्याने गर्लफ्रेंडला घेऊन स्पामध्ये असल्याची थाप मारून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला.
या ग्राहकांना आज करणार हजर

स्पामध्ये ग्राहक म्हणून आलेले प्रदीप शंकरलाल शर्मा (52, रा. पवननगर, टीव्ही सेंटर), रोहन राजेंद्र कुलकर्णी (26, रा. रिलायन्स पंपाजवळ, सिडको),अकीब अक्रम खान पटेल (23, रा. उस्मानपुरा) व इराकी विद्यार्थी येमेन अब्दुल हमीद जासेम यांना रंगेहाथ अटक केली होती. त्यांना न्यायालयाने 11 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. सोमवारी कोठडीची मुदत संपत असल्याने पोलिस त्यांना पुन्हा
न्यायालयात हजर करणार आहेत.