Thu, Jun 20, 2019 00:30होमपेज › Aurangabad › औरंगाबाद पोलिसांची आता ताकद संपली... 

औरंगाबाद पोलिसांची आता ताकद संपली... 

Published On: May 21 2018 1:08AM | Last Updated: May 21 2018 12:19AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

अमितेशकुमार साहेब, आपण मुंबईला आलात आणि औरंगाबाद पोलिसांची ताकद संपली. आपला वचक, छाप होती. आपल्या नावावर गुंंडागर्दी बंद होती. आपल्यानंतर आम्ही हिंमत खचलोत. भीमा कोरेगाव, कचरा प्रश्‍न आणि राजाबाजार, शहागंज या तिन्ही दंगलींमध्ये आम्ही जखमी झालोत. आपली आठवण औरंगाबादकरांना व आम्हास येते, असे पत्र लिहून जखमी सहायक पोलिस आयुक्‍त गोवर्धन कोळेकर यांनी औरंगाबाद पोलिसांची खदखद अखेर व्यक्‍त केली. मागच्या वर्षभरात (पोलिस आयुक्‍त यशस्वी यादव यांचा कार्यकाळ) पोलिसांचे किती खच्चीकरण झाले, हे त्यांच्या पत्रातून समोर आले. 

जुन्या औरंगाबादेत 11 आणि 12 मे रोजी घडलेल्या दंगलीनंतर सर्वच बाजूंनी पोलिसांवर आरोपांच्या फैरी झडत आहेत. या दंगलीत एसीपी कोळेकर यांच्यासह रामेश्‍वर थोरात, ज्ञानोबा मुंढे, निरीक्षक श्रीपाद परोपकारी, हेमंत कदम, राजश्री आडे, पोलिस नाईक बापूराव बाविस्कर आदींना जबर मार लागला. कोळेकर तर तब्बल 12 तास बेशुद्ध होते. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. आताही ते बोलू शकत नाहीत. त्यामुळे पत्र लिहून त्यांनी आपली खदखद व्यक्‍त केली. 

म्हणाले, समाधानी राहावे नशिबाच्या पुढे कोणीही जाऊ शकत नाही. त्यामुळे समाधानी राहावे, असा संदेशही कोळेकर यांनी पत्रातून दिला.

वरिष्ठांसह सहकार्‍यांचे आभार

एसीपी कोळेकर यांनी पत्रात पोलिस महासंचालक, पोलिस आयुक्‍त मिलिंद भारंबे, उपायुक्‍त विनायक ढाकणे, दीपाली धाटे-घाडगे, राहुल श्रीरामे यांच्यासह सर्व अधिकारी आणि औरंगाबाद पोलिस दलाचे आभार व्यक्‍त केले. सोबतच लोकप्रतिनिधी आणि डॉ. टाकळकर व त्यांच्या टीमचेही विशेष आभार व्यक्‍त केले.

मोतीकारंजात अंधारामुळे दगड लागला

गांधीनगर येथील हनुमान मंदिरापासून मोतीकारंजापर्यंत आम्ही जमाव पांगवत गेलो. मोतीकारंजा येथे 23.00(अकरा) वाजेच्या सुमारास दगड लागल्याची घटना घडली. यापूर्वीही दोन वेळा असेच घडले. कचरा प्रश्‍नावरून दंगल उसळली तेव्हाही आम्ही दोघेच होतो. यापूर्वीच्या दंगलीतही कोळेकर जखमी झाले होते. 

सेना म्हणायची मीनाबाजार नको

शहागंज ते सिटी चौक या रस्त्यावर मीनाबाजार भरू द्यायचा नाही, असे लच्छू पहेलवान व शिवसेना म्हणत होती, तर मुस्लिम समुदाय तेथेच बाजार भरविण्यावर ठाम होते. दंगलीचे हे एक करण आतापर्यंत सांगितले जायचे, पण कोळेकरांच्या पत्रातून हे पुन्हा समोर आले.