Wed, Jun 26, 2019 17:47होमपेज › Aurangabad › प्रशासनाला अक्कल येऊ दे म्हणून केले भजन

प्रशासनाला अक्कल येऊ दे म्हणून केले भजन

Published On: Mar 03 2018 12:20PM | Last Updated: Mar 03 2018 12:20PMऔरंगाबाद : प्रतिनिधी 

औरंगाबाद शहरात कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. शहरात निर्माण होणारा कचरा आसपासच्या खेडे गावात टाकला जात आहे. याप्रकाराला गावातील लोकांनी तीव्र विरोध केला आहे. 

वारंवार विरोध करूनही औरंगाबाद महापालिकेकडून कचरा गावात आणून टाकला जात असल्याने त्रस्त झालेल्या कांचंनवाडीतील गावकऱ्यांनी आज गावात येणारे कचऱ्याचे ट्रक अडवून धरले, कोणत्याही परिस्थितीत गावात कचरा टाकू दिला जाणार नाही अशी भूमिका कांचंनवाडीतील नागरिकांनी घेतली. यावेळी महानगरपालिका प्रशासनाला अक्कल येऊ दे, म्हणून नागरिकांनी भजन करत अनोखे आंदोलन केले.