Wed, Nov 14, 2018 13:16होमपेज › Aurangabad › येत्या आर्थिक वर्षात मालमत्ता करवाढ? 

येत्या आर्थिक वर्षात मालमत्ता करवाढ? 

Published On: Feb 04 2018 1:50AM | Last Updated: Feb 04 2018 1:41AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

महानगर पालिका प्रशासनाने येत्या आर्थिक वर्षात मालमत्ता करात सरासरी 25 टक्के वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठविला आहे. नव्याने नोंद होणार्‍या मालमत्तांना ही वाढ करण्याचे सुचविण्यात आले आहे. आधीच नोंदणीकृत असलेल्या मालमत्तांच्या करात मात्र कोणतीही वाढ प्रस्तावित करण्यात आलेली नाही. या प्रस्तावावर बुधवार, दि. 7 फेब्रुवारी रोजी स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.

महानगरपालिका अधिनियमातील नियम 99 नुसार दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात आगामी आर्थिक वर्षासाठी करांचे दर निश्‍चित करणे आवश्यक असते. त्यानुसार औरंगाबाद मनपा प्रशासनाने नवीन दरांबाबत प्रस्ताव सादर केला आहे. यात सध्या मनपाकडे नोंदणीकृत असलेल्या मालमत्तांच्या करात कोणतीही वाढ सुचविण्यात आली आहे. सध्या मनपाच्या दप्‍तरी 2 लाख मालमत्तांचीच नोंद आहे. या नोंदणीकृत मालमत्तांच्या करात कोणतीही वाढ सुचविण्यात आलेली नाही. मनपाकडून निवासी, निवासेतर, व्यावसायिक, शैक्षणिक संस्था, भारत सरकारच्या मिळकती, मोबाइल टॉवर्स, औद्योगिक इमारती अशा गटांत मालमत्ता कर वसूल केला जातो. या सर्वच गटांंतील आधीच्या नोंदणीकृत मालमत्तांच्या करात वाढ प्रस्तावित करण्यात आलेली नाही. मनपा स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी हा प्रस्ताव मांडला जाऊन त्यावर निर्णय घेण्यात येईल.