Thu, Jul 18, 2019 20:49होमपेज › Aurangabad › घरकूूल वंचित लाभार्थींचे उद्यापासून उपोषण

घरकूूल वंचित लाभार्थींचे उद्यापासून उपोषण

Published On: Jan 10 2018 2:26AM | Last Updated: Jan 10 2018 2:21AM

बुकमार्क करा
औरंगाबाद ः प्रतिनिधी

गोरगरिबांच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी शासनाने घरकूूल योजना अंमलात आणली. मात्र, काही महाभाग कागदोपत्री लाभार्थींना घरकूूल दिल्याचे भासवून स्वतःच अनुदानाचे पैसे लुबाडत आहेत. विशेष म्हणजे यात शासकीय अधिकारी-कर्मचार्‍यांचे रॅकेटच सक्रिय आहे. अशाच प्रकारे आपल्या नावेही घरकूूल दिल्याचे दाखवून लाभ उचलण्यात आल्याचा आरोप वंचित लाभार्थी जनार्दन भालेराव यांनी केला आहे. या प्रकरणात न्याय मिळण्यासाठी तसेच दोषी अधिकार्‍यांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी भालेराव गुरुवारपासून जिल्हा परिषदेसमोर उपोषणास बसणार आहेत.

औरंगाबाद तालुक्यातील सेलूद चरठा गावचे रहिवासी जनार्दन साळुबा भालेराव यांना 2007-08 मध्ये रमाई घरकूूल योजनेत घरकूूूल मंजूर झाले. त्यानुसार त्यांनी घर बांधले आणि त्याचे लाभही उचलल्याचे सरकार दफ्तरी नोंदवण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात आपल्याला लाभ मिळालेलेच नाही, अशी भालेराव यांची तक्रार आहे. तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक, आर्किटेक्ट, अभियंता यांनी प्रत्यक्ष पाहणी करून लाभ दिल्याचे कागदोपत्री दर्शवले आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींना शासन करावे, अशी मागणी भालेराव यांनी केली असून गुरुवारपासून जि. प. समोर उपोषणही करणार आहेत. विभागीय आयुक्‍त, जि. प. सीईओ, जिल्हाधिकारी, पोलिस ठाण्यांमध्ये तक्रार अर्ज दिले आहेत.