Sun, May 26, 2019 14:53होमपेज › Aurangabad › औरंगाबादेत कचरा प्रश्न चिघळला

औरंगाबादेत कचरा प्रश्न चिघळला

Published On: Mar 07 2018 5:59PM | Last Updated: Mar 07 2018 5:59PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

औरंगाबादमध्ये कचरा प्रकरण चांगलेच पेटले आहे. आज मिटमिटा येथे कचरा टाकण्यासाठी एक पथक पोलिसांसोबत गेले होते. यावेळी स्‍थानिक नागरिकांनी याला जोरदार विरोध केला. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये झालेल्‍या संघर्षाने तणाव निर्माण झाला आहे. आंदोलकांनी कचर्‍याच्या गाड्या फोडून दगडफेक केल्‍याने पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे. 

गेल्‍या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरातील कचर्‍याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कचरा टाकण्याच्या जागेवरून मनपा आणि ग्रामस्थांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. आज औरंगाबाद मिटमिटा येथे कचरा टाकण्यावरून आंदोलन पेटले. यावेळी औरंगाबाद -मुंबई महामार्गावरील मिटमिटा या ठिकाणी नागरिकांनी आंदोलन छेडले. यावेळी आंदोलकांचा उद्रेक पाहून त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार आणि अश्रूधूराच्या कांड्या फोडल्या. यावेळी संतप्त जमावाने कचरा गाड्यांना आपले लक्ष केले. नारेगावात कचरा टाकण्यासाठी कचरा घेउन निघालेल्‍या दोन गाड्यांवर आंदोलकांनी दगडफेक केली. तसेच या गाड्या पेटउन देण्याचा प्रयत्‍न केला. यावेळी आंदोलकांनी केलेल्‍या दगडफेकीमध्ये पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख जखमी झाले आहेत. याठिकानी  परिसराला छावनीचे स्‍वरूप आले असून, या तणावपूर्ण परिस्‍थिती निर्माण झाली आहे.