Sun, Aug 25, 2019 23:27होमपेज › Aurangabad › आठवलेंची सभा उधळली; 5 मिनिटांत भाषण आटोपले, खुर्च्यांची फेकाफेकी

आठवलेंची सभा उधळली; 5 मिनिटांत भाषण आटोपले

Published On: Jan 15 2018 2:09AM | Last Updated: Jan 15 2018 9:03AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या रविवारी झालेल्या सभेत प्रचंड गोंधळ उडाला. आंबेडकरी जनतेने आठवले यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. खुर्च्यांची फेकाफेकीही करण्यात आली. या गोंधळातच आठवले यांनी अवघ्या पाच मिनिटांत आपले भाषण आटोपते घेतले. 

वाचा: कोरेगाव भीमाच्या घटनेमागे मराठा संघटनांचा हात: रामदास आठवले 

नामविस्तार दिनानिमित्त सर्वच नेत्यांना एका मंच असवा, अशी संकल्पना येथील तरुणांनी पुढे आणली. आठवले यांचा अपवाद वगळता सर्व दलित नेत्यांनी पाठिंबा देत त्यांनी कार्यक्रमात हजेरी लावली; परंतु या कार्यक्रमांकडे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी येण्यास नकार दिल्याने कार्यकत्यांनी नाराजी दाखवत कार्यक्रमात गोंधळ घातला. समता सैनिक दलांनी भीमा कोरेगाव प्रकरणी जाब विचारून विरोधी घोषणा दिल्या. त्यांच्या जोडीला इतर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी सभास्थानी खुर्च्याची फेकाफेक सुुरू केल्याने एकच गोंधळ उडाला.

तरुणांना शांत करण्यासाठी पोलिस आयुक्‍त यशस्वी यादव यांनी मोठा फौजफाटा सभेस्थानी लावला होता. विरोधी घोषणाबाजीतही आठवले यांनी पाच मिनिटे ऐक्यावर बोलून भाषण आवरते घेतले.  तणावपूर्ण वातावरण सभा सुरू हेाण्यापूर्वीच येथे जमलेल्या कार्यकर्त्यांनी सभेला विरोध केला होता. आठवले बोलण्याच्या अगोदरपासूनच खुर्च्यांची तोडफोड केली. आठवलेविरोधी घोषणा देत, भीमा कोरेगाव प्रकरणी जाब विचारला.

वाचा : प्रकाश आंबेडकर राजे..आठवलेंचे जोरदार प्रत्युत्तर

अशा गोंधळात आठवले बोलण्यास उठवल्यावर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला विरोध दर्शवला. कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांची मोठ्या प्रमाणात धावपळ झाली. कार्यकर्त्यांच्या गोंधळामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण बनले होते. 

तर गट बरखास्त करतो

तणावपूर्ण वातावरणात रामदास आठवले यांनी अवघ्या पाच मिनिटांत आपले भाषण आटोपते घेतले. ऐक्य होणार असेल तर माझा गट बरखास्त करण्याची माझी तयारी आहे.

मात्र, केवळ एक दिवस स्टेजवर जाण्याचे नाटक मी करणार नाही. मी ऐक्याची भूमिका मांडणारा नेता आहे; पण एक दिवस एका मंचावर येऊन ऐक्य होणार नाही. त्यासाठी आधी ऐक्याचा फॉर्म्युला तयार झाला पाहिजे. प्रकाश आंबेडकरांशिवाय हे ऐक्य शक्य नाही, असेही आठवलेंनी यावेळी सांगितले.