Mon, Jul 06, 2020 12:09होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : व्हिडिओकॉनच्या कामगारांना अटक व सुटका

औरंगाबाद : व्हिडिओकॉनच्या कामगारांना अटक व सुटका

Last Updated: Nov 07 2019 2:58PM
औरंगाबाद : प्रतिनिधी  

ऑटो कार्स व्हिडीओकॉन ग्रुपचे कामगारांचे वेतन थकलेले आहे. या थकीत वेतनासाठी शिवसेनेचे खासदार राजकुमार धूत यांच्या बंगल्यावर गुरुवार (ता. ७) ११ वाजता मोर्चा काढण्यात येणार होता. परंतु, मोर्चासाठी पोलिसांची परवानगी नसल्याने कामगारांना उपोषण स्थळावरूनच क्रांती चौक पोलिसांनी अटक केली. दरम्यान काही वेळानंतर सर्व कर्मचाऱ्यांना सोडण्यात आले आहे. 

ऑटो कार्स व्हिडीओकॉन ग्रुपच्या 340 कामगारांच्या थकीत वेतनासाठी गेल्या 72 दिवसांपासून सहाय्यक कामगार उपायुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. परंतु कामगारांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने कामगारांनी लोकशाही मार्गाने हा धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. या मोर्चासाठी कामगारांनी रितसर पोलिसांना परवानगी मागितली होती.

मात्र पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाकारली होती. परवानगी नसली तरी कामगारांच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कामगार उपायुक्त कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषण स्थळावरून कामगारांना ताब्यात घेतले.