Thu, Nov 15, 2018 13:49होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : महिलेने चोरले बाळ

औरंगाबाद : महिलेने चोरले बाळ

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

कबीरनगरातील एका 60 वर्षीय महिलेकडे शनिवारी दीड महिन्याचे बाळ सापडले. हे बाळ त्या महिलेने चोरून आणल्याचा संशय पोलिसांना असून, रविवारी काही खळबळजनक माहिती समोर येऊ शकते असे पोलिसांनी सांगितले. या महिलेने बाळ चोरले असावे, अशी माहिती मिळताच पोलिसांनी तिचे घर गाठले. मात्र, बाळाच्या आई- वडिलांनीच त्याला माझ्याकडे दिल्याचे तिने सांगितले. तिने आई-वडिलांचा फोन नंबरही दिला. त्यावर चौकशी केली असता आम्ही पुणे येथे असून रविवारी येतो, असे सांगून त्यांनी फोन ठेवला.

रविवारी ते आल्यावरच विविध प्रश्‍नांचा उलगडा होणार आहे. दरम्यान, या महिलेस रविवारी ठाण्यात हजर होण्यास सांगितले असून, बालकल्याण समितीलाही कळवण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर बाळाला काल्डा कॉर्नर येथील एका एनजीओकडे सांभाळण्यास सोपविल्याचे उस्मानपुरा ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक राहुल चव्हाण यांनी सांगितले.