Sat, Nov 17, 2018 16:34होमपेज › Aurangabad › आडगावकरांनीही केली दारे बंद

आडगावकरांनीही केली दारे बंद

Published On: Feb 28 2018 2:23AM | Last Updated: Feb 28 2018 2:21AMऔरंगाबाद  :  प्रतिनिधी

गावात कचरा आणला तर, उचलून पुन्हा शहरात नेऊन टाकू, कचरा तर दूर, कचर्‍याची एक काडीही टाकू देणार नाही, असा इशारा आडगाववासीयांनी मनपा आणि महसूल अधिकार्‍यांच्या पथकाला दिला. मंगळवारी सायंकाळी मनपा आयुक्‍त डी. एम. मुगळीकर, उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, तहसीलदार सतीश सोनी यांच्यासह मनपाचे अधिकारी आडगाव बु. येथील खदानीची पाहणी करण्यासाठी गेले होते. बाभुळगाव, वाळूज, तीसगाव-मिटमिटाप्रमाणे आडगावलाही आलेला अनुभव काही वेगळा नव्हता. 
शुक्रवारपासून (दि.16) नारेगाववासीयांनी आंदोलन तीव्र करत नारेगाव डेपोवर कचरा आणून टाकण्यास विरोध केलेला आहे.

मंगळवारी या आंदोलनाचा बारावा दिवस होता. दरम्यानच्या काळात पैठण रोडवरील बाभुळगावला कचरा नेऊन टाकण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी हाणून पाडला. त्यानंतर मनपा प्रशासनाने वाळूज, तीसगाव, मिटमिटा आदी ठिकाणी कचरा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी ग्रामस्थांनी मनधरणीही केली. मात्र, एकदा का कचरा टाकू दिला, तर आयुष्यभरासाठी कचरा डेपो इथून हटणार नाही, आपलीही नारेगाववासीयांप्रमाणे गत होईल, अशी भीती ग्रामस्थांना