Thu, May 23, 2019 20:55
    ब्रेकिंग    होमपेज › Aurangabad › एसटी चालकास मारहाण;

एसटी चालकास मारहाण;

Published On: Jan 10 2018 2:26AM | Last Updated: Jan 10 2018 2:16AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

रस्त्यातील रिक्षा बाजूला घे, असे सांगताच एसटी चालकाची कॉलर पकडून शिवीगाळ व मारहाण करणार्‍या दोन रिक्षाचालकांना सहा महिने सक्‍तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. काळे यांनी ठोठावली. याप्रकरणी सिडको आगारातील सिटी बसचालक रामेश्‍वर विठोबा काळे यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, 10 सप्टेंबर 2016 रोजी फिर्यादी चिकलठाणा परिसरातून बस घेऊन येत होता. त्यावेळी रस्त्यातील रिक्षा बाजूला घे, असे सांगताच आरोपी शेख अन्वर शेख अफसर (20, रा. चिकलठाणा) आणि  शेख इरफान शेख शहाबाज (28, रा. आंबेडकरनगर, एन-सात) यांनी फिर्यादीची कॉलर पकडून शिवीगाळ करीत मारहाण केली.

तसेच ठार मारण्याची धमकी दिली आणि बसची काचही फोडली. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. खटल्याच्या वेळी, सहायक सरकारी वकील सुनील भगुरे यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजूंच्या युक्‍तिवादांती व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने दोन्ही आरोपींना कलम 353 अन्वये सहा महिने सक्‍तमजुरी व एक हजार रुपये दंड, कलम 323 अन्वये तीन महिने सक्‍तमजुरी व 500 रुपये दंड व कलम 427 अन्वये तीन महिने सक्‍तमजुरी व 500 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.