Mon, May 20, 2019 20:07होमपेज › Aurangabad › औरंगाबाद हिंसाचार : जखमी ACP कोळेकर अत्यावस्थ 

औरंगाबाद हिंसाचार : जखमी ACP कोळेकर अत्यावस्थ 

Published On: May 12 2018 3:51PM | Last Updated: May 12 2018 3:51PMऔरंगाबाद: प्रतिनिधी 
शहरातील अनधिकृत नळ कनेक्शनाच्या वादातून उसळलेल्या दंगलीवर नियंत्रण मिळवताना जखमी झालेल्या सहाय्यक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. कोळेकर यांच्यावर सिग्मा या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हिंचाचार रोखण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर शुक्रवारी मध्यरात्री दगडफेक करण्यात आली होती. यात कोळेकर गंभीर जखमी झाले आहेत. स्वरयंत्रणेच्या हाडाला जबर मार बसल्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे, अशी प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.  

 अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यावरून शुक्रवारी रात्री दोन गटात  हणामारीचा प्रकार घडला. दोन गटातील वाद इतका टोकाला गेला की, शहागंज परिसरात मोठ्याप्रमाणात जाळपोळ करण्यात आली. दगडफेकीत अनेक नागरिकांसह पोलिस कर्मचारी आणि अधिकारी देखील जखमी झाले आहेत. पोलिस प्रशासनाने शहरात संचारबंदी लागू केली आहे. तसेच जिल्हाप्रशासनाने शहरात इंटरनेट सेवा बंद केली आहे.

 वाचा : औरंगाबाद हिंसाचार : दोघांचा मृत्यू; जमावबंदीनंतर तणावपूर्ण शांतता