Sat, Nov 17, 2018 23:22होमपेज › Aurangabad › औरंगाबाद, पैठण तालुक्यातील प्रत्येकी एक शाळा होणार बंद

औरंगाबाद, पैठण तालुक्यातील प्रत्येकी एक शाळा होणार बंद

Published On: Dec 04 2017 1:39AM | Last Updated: Dec 04 2017 1:05AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या 1314 शाळा पहिल्या टप्यात बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने घेतला. यात औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या 40 शाळांचा समावेश असून सिल्‍लोड तालुक्यातील सर्वाधिक 20 म्हणजे निम्म्या शाळा आहे. सर्वात कमी औरंगाबाद आणि पैठण तालुक्यांतील प्रत्येकी एक-एक शाळा बंद होणार आहे. गुणवत्ता आणि पटसंख्या घसरल्याने जि.प.च्या जिल्ह्यातील 40 शाळा बंद करण्यात येणार आहे.

याविषयी राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना पत्र पाठवून या शाळांत शिकणार्‍या विद्यार्थ्यांचे नजिकच्या चांगल्या गुणवत्तेमुळे पटसंख्या वाढत असलेल्या शाळांमध्ये समायोजन करण्याचे आदेश दिले आहेत. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे एक  किलोमीटर अंतरावरील तर उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना तीन किलोमीटरच्या आतिल शाळेत समायोजन करण्यात येणार आहे. 

80 शिक्षक अतिरिक्‍त जि.प.च्या बंद करण्यात येणार्‍या 40 शाळांमधील 80 शिक्षक अतिरिक्त ठरणार आहे. विद्यार्थ्यांप्रमाणे या शिक्षकांचेही जवळच्या शाळांमध्ये समाजयोन करण्याचे शासनाने ठरवले आहे.  जिल्हा परिषदेच्या एकूण 2 हजार 90 शाळा होत्या, चार शाळा यापूर्वीच बंद झालेल्या आहेत. आता आणखी 40 शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या 2 हजार 46 वर आली आहे. शनीवारी (दि. दोन) जि. प.च्या शिक्षण सभापती मिना शेळके यांच्या अध्यक्षतेखाली शालेय समितीची बैठक झाली. या बैठकीत गुणवत्ता व पटसंख्या घसरल्याने शाळा बंद होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. शाळांची गुणवत्ता राखण्यासाठी भरारी पथकांची स्थापना करुन तपासणीचे आदेश दिले.