Fri, Mar 22, 2019 07:42होमपेज › Aurangabad › स्थायी समितीवर पुन्हा बारवाल; नाराज नगरसेवकांचा धुडगूस

स्थायी समितीवर पुन्हा बारवाल; नाराज नगरसेवकांचा धुडगूस

Published On: Apr 26 2018 3:31PM | Last Updated: Apr 26 2018 3:31PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

दिलेला शब्द पाळला नसल्याने नगरसेवकांनी आज (२६ एप्रिल) महापालिका सभापती दालनात धुडगूस घातला. महापालिका समितीच्या सदस्य निवडीवेळी शहर विकास आघाडीचे गटनेते तथा स्थायी समितीचे मावळते सभापती गजानन बारवाल यांनी शब्द पाळला नसल्याने नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. महापालिका प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. परंतु शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जयस्वाल यांनी मध्यस्थी करून पोलिसांना बाहेर काढले. 

अपक्ष नगरसेवकांची मोट बांधून शिवसेनेतून बाहेर पडलेले आणि भाजप पुरस्कृत अपक्ष नगरसेवक गजानन बारवाल यांनी दोन वर्षांपूर्वी स्थायी समितीमध्ये त्यांचा सदस्य म्हणून प्रवेश व्हावा यासाठी कैलास गायकवाड या आपल्या आघाडीतील सहकार्याचा राजीनामा घेतला होता.  गायकवाड यांचा राजीनामा घेताना तुम्हाला पुढच्या वेळेस स्थायी समितीमध्ये जाण्याची पुन्हा संधी देऊ असा शब्द दिला होता. 

यामुळे दोन वर्ष सभापतिपदाचा उपभोग घेतल्यानंतर या वेळेस तरी इतर सदस्यांना संधी देतील अशी अपेक्षा होती. मात्र झाले उलटेच दोन वर्ष स्थायी समिती सभापती पद यानंतरही गजानन बारवाल यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे कैलास गायकवाड यांच्या नावाची शिफारस करण्याच्या ऐवजी दुसऱ्यांनाही आपले नाव बन्दले पाड्यांमध्ये महापौरांकडे दिले. 

यावरून दुखावलेले कैलास गायकवाड आणि गोकुळ हलके, राहुल सोनवणे हे अपक्ष नगरसेवक नगरसेवक संतप्त झाले. विशेष सर्वसाधारण सभा सुरू होण्यापूर्वी भाजपचे गटनेते प्रमोद राठोड नंतर  बारवाल यांचे दालन गाठले. बारवालांना घेराव घालून त्यांनी याचा जाब विचारण्यास सुरुवात केली. यावेळी बारवाल मूग गिळून गप्प बसले. संतप्त नगरसेवकांनी बारवालाना अर्वाच्च भाषेमध्ये शिवीगाळ सुरू केली.

कैलास गायकवाड यांना नाही तरी किमान इतर सदस्यांचे तरी नाव तुम्ही शिफारस करायला पाहिजे होती असे न करता स्वतःचीच नाव पुन्हा कसे काय तुम्ही दिले यावरून वातावरण चांगलेच तापले ही माहिती मिळताच शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जयस्वाल मनपात दाखल झाले. त्यांनी सभापती बारवाले यांच्या दालनामध्ये जाऊन संतप्त नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यांची समजूत काढली. याचवेळी दालनामध्ये पोलिस दाखल झाले परंतु जयस्वाल यांनी मध्यस्थी करून पोलिसांना परत पाठवत पाठवले. शेवटी नगरसेवक बारवाल यांच्या नावाने मुर्दाबाद कार्यालय अशी घोषणाबाजी करत तोडफोडही केली. 

Tags : Aurangabad, Municipal carporation,Standing comitee, Chairman, Carporaters