Wed, Nov 21, 2018 01:05होमपेज › Aurangabad › लोककलेने रसिकांना घातली भुरळ

लोककलेने रसिकांना घातली भुरळ

Published On: Feb 20 2018 1:53AM | Last Updated: Feb 20 2018 1:24AMऔरंगाबाद :प्रतिनिधी

महाराष्ट्रातील लोककलेचा आविष्कार करत शिवकालीन संस्कृतीतील अनोखे दर्शन गणपती नमन, शिवगाथा, बतावणी, शाहिरी, पोवाडा, गोंधळ, लेझीम, कोळीनृत्य, भारुड, लावणी तसेच शेतकरी नृत्यातून दिलीप खंडेराय आणि समूहाने पिसादेवीकरांना घडविले. शिवजयंतीनिमित्त एबी ग्रुपतर्फे पिसादेवी येथे चार दिवसीय शिवजन्मोत्सवात महाराष्ट्राची लोकधारा हा मराठमोळा कार्यक्रम सादर करण्यात आला.

उद्घाटन आयोजक तथा एबी ग्रुपचे संचालक आजिनाथ धामणे, भाऊसाहेब काळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रीती राजपूत यांनी सादर केलेल्या लावणीने रसिकांना खिळवून ठेवले, तर शाहीर रमेश गिरी, मधुकर पाटील यांच्या बतावणीने प्रेक्षकांना खळखळून हसविले. विकास मिसाळ, सिद्धार्थ गायकवाड, गणेश क्षीरसागर, प्रफुल्‍ल सोनवणे, रोहित सोनवणे, बळीराम करपे, राज देशमाने, साहेल पटेल, नजीम पटेल, कृष्णा करपे यांनी सादर केलेल्या विविध लोककला नृत्यांना भरभरून दाद दिली.