Mon, May 25, 2020 22:15होमपेज › Aurangabad › गंगापूरच्या मनसे उमदेवाराचा अर्ज बाद

गंगापूरच्या मनसे उमदेवाराचा अर्ज बाद

Published On: Oct 07 2019 2:49PM | Last Updated: Oct 07 2019 3:07PM

संग्रहित छायाचित्रऔरंगाबाद :  प्रतिनिधी 

गंगापूर मतदारसंघातील मनसेचे उमेदवार अभिजित अधिकारी यांनी आपल्या शपथपत्रासोबत सत्यप्रत ऐवजी ए. बी. फॉर्मची रंगीत प्रत जोडली. त्यांच्या या चुकीमुळे आयोगाने त्यांचा अर्ज बाद ठरवला. आपल्याला म्हणणे मांडायचा वेळही देण्यात आला नाही, असा आरोप करीत आता अधिकारी यांनी आयोगाविरुध्द कोर्टात धाव घेतली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातून मनसेने फुलंब्री, वैजापूर आणि गंगापूर या तिन्ही मतदारसंघात उमेदवार दिले. मात्र, यापैकी गंगापूर मतदारसंघातील मनसे उमेदवार अधिकारी यांचा अर्ज आयोगाने ए.बी.फॉर्मची सत्यप्रत नसल्याच्या कारणाने बाद ठरवल्याचे समोर आले आहे. अधिकारी यांना पक्षाने अधिकृत उमेदवार म्हणून ए.बी.फॉर्म दिला होता. परंतु अर्ज दाखल करण्याच्यावेळी त्यांच्याकडून चुकीने ए.बी.फॉर्मच्या सत्यप्रत ऐवजी त्याची रंगीत कॉपी जोडली गेली. उमेदवारांच्या अर्ज छाननीत हा प्रकार निवडणूक अधिकार्‍यांच्या लक्षात आला. त्यामुळे मनसे उमेदवार अधिकारी यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला आहे. 

शपथपत्र दाखल करताना रंगीत कॉपी जोडली गेली. हा प्रकार चुकीने झाला. परंतु आपल्याकडे ए. बी.फॉर्मची सत्यप्रत आहे. अर्ज बाद करताना इतर उमेदवारांना दहा मिनिटे म्हणणे मांडायची संधी दिली. मात्र, आपल्याला देण्यात आली नाही. रिजेक्ट अर्जांची प्रतही सायंकाळी दिली. आयोगाविरुध्द कोर्टात याचिका दाखल केली आहे.

-अभिजीत अधिकारी, मनसे उमेदवार