Sat, Feb 23, 2019 23:25होमपेज › Aurangabad › दारूवरच्या कारवाईत  औरंगाबाद सर्वात पुढे

दारूवरच्या कारवाईत  औरंगाबाद सर्वात पुढे

Published On: Feb 01 2018 1:42AM | Last Updated: Feb 01 2018 1:17AMऔरंगाबाद ः प्रतिनिधी

चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात राज्यात पहिला क्रमांक पटकावल्यानंतर औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या आणखी एका उल्लेखनीय कामगिरीची पोलिस दलात जोरदार चर्चा आहे. अवैध दारू विक्रीच्या सर्वात जास्त केसेस करून अवैध धंद्याला थारा नाही, असा संदेश पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी दिला. विशेष म्हणजे, नांदेड, बीडसारख्या मोठ्या जिल्ह्यांना मागे टाकून त्यांनी पहिला क्रमांक पटकावला.

पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी नऊ महिन्यांपूर्वी औरंगाबाद ग्रामीण पोलिस दलाची सूत्रे स्वीकारली. पहिल्या दिवसापासून त्यांचा जिल्ह्यात दरारा कायम असून अवैध धंदेवाल्यांवर वचक ठेवण्यात त्यांना चांगले यश मिळाले आहे. अधिकार्‍यांच्या बदल्या करून पोलिस दलाची घडी बसविण्यात त्या यशस्वी ठरल्या असून उपअधीक्षकांच्या स्तरावर दरोडा प्रतिबंधक पथक स्थापन करण्याचा त्यांचा निर्णयही फायदेशीर ठरला आहे. पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी वाळू माफियांवर अंकुश ठेवला पोलिस दलाला आधुनिकतेची जोड देण्यातही त्या कुठेच कमी नसल्याचे पाहायला मिळत आहे. एम-पासपोर्ट, ऑनलाइन तक्रार, ऑनलाइन दंड वसुली यासारखे अनेक उपक्रम त्यांच्या कार्यकाळात सुरू झाले आहेत. 

या सर्व बाबींमुळे चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यात औरंगाबाद ग्रामीण पोलिस राज्यात पहिल्या क्रमांकावर असून शिक्षेच्या प्रमाणातही औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी चौथा क्रमांकावर झेप घेतली आहे.