Mon, Aug 19, 2019 05:10होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : जाळून घेतलेल्या चार्ली पोलिसाचा मृत्यू

औरंगाबाद : जाळून घेतलेल्या चार्ली पोलिसाचा मृत्यू

Published On: Mar 13 2018 11:03AM | Last Updated: Mar 13 2018 11:05AMऔरंगाबाद : प्रतिनिधी 

अवघ्या 20 दिवसांवर लग्‍न येऊन ठेपलेल्या चार्ली पोलिसाने अंगावर पेट्रोल ओतून घेत पेटवून घेतले. लग्‍न जमलेल्या मुलीशी वाद झाल्यावर त्याने लग्‍नाला नकार दिला होता. या वादावर तोडगा काढण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत लग्‍न कर, अन्यथा अब्रुनुकसानाचा 25 लाखांचा दावा करू, अशी धमकी मुलीकडच्यांनी दिल्यामुळे त्याने सोमवारी सकाळी 9 वाजता आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यामध्ये तो 95 टक्के भाजला होता व त्याच्यावर घाटीत उपचार सुरू होते. 

अनिल अशोक घुले (२५, बक्‍कल क्र. १८८७, रा. मयूर पार्क) असे चार्ली पोलिसाचे नाव आहे. लग्‍नावरून वाद सुरू असल्याने अनिल तीन दिवसांपासून सुटीवर होता. 

लग्नाच्या वादावरून अंगावर पेट्रोल टाकून स्वत:ला जाळून घेतलेल्या औरंगाबाद शहर पोलिस दलात चार्ली पथकात अनिल अशोक घुले होते.त्यांच्यावर उपचार सुरू असताना मध्यरात्री दीड वाजता त्‍याचा मृत्यू झाला. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून नातेवाईकांची तक्रार असल्यास या प्रकरणी गुन्हा दाखल  करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिली आहे.

लग्‍नाचा वाद; चार्ली पथकातील पोलिसाने घेतले पेटवून