होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : न्यायालयाचे कामकाज मराठीतून

औरंगाबाद : न्यायालयाचे कामकाज मराठीतून

Published On: Feb 27 2018 2:01PM | Last Updated: Feb 27 2018 2:01PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त मुंबई उच्च  न्यायालयाच्या  औरंगाबाद खंडपीठातल्या न्यायालयात आज संपू्र्ण युक्तीवाद मराठीतून करण्यात आले.  न्यायमूर्ती संभाजी शिंदे आणि न्यायमूर्ती एस.एम.गव्हाणे यांनी दिले आणि कामकाज मराठीत चालवले. 

उच्च न्यायालयाच्या कामकाजाची भाषा इंग्रजी  असावी, असे घटनेच्या ३४८ कलमात नमूद आहे. परंतु, मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने कामकाज मराठीत चालवण्याचे आदेश दिले. याबद्दल मुख्य सरकारी वकील अमरजित सिंह गिरासे यांनी न्यायमूर्तींचे अभिनंदन केले. सगळ्या विधिज्ञांनी मराठीतून युक्तिवाद करून मराठी दिन साजरा केला.