Sun, Jul 21, 2019 16:12
    ब्रेकिंग    होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : सिडकोतील उड्डाणपुलाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्यावरून गोंधळ

औरंगाबाद : सिडकोतील उड्डाणपुलाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्यावरून गोंधळ

Published On: May 27 2018 12:06PM | Last Updated: May 27 2018 12:06PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

मनपाच्यावतीने सिडकोतील उड्डाण पुलाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच बंजारा संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी तिथे दाखल होत, या कार्यक्रमास तीव्र विरोध केला. याठिकाणी वसंतराव नाईक यांचा पुतळा असल्यामुळे उड्डाणपुलाला दुसऱ्याचे नाव देता कामा नये अशी भूमिका घेत या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी महापौर नंदकुमार घोडले आणी आमदार अतुल सावे यांना घेराव घातला त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.