Sun, Jul 21, 2019 09:53होमपेज › Aurangabad › शुल्काअभावी रखडली  जमिनीची मोजणी

शुल्काअभावी रखडली  जमिनीची मोजणी

Published On: Feb 14 2018 2:50AM | Last Updated: Feb 14 2018 2:15AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

औरंगाबाद विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी लागणार्‍या 182 एकरच्या जमिनीचे मोजमाप केवळ मोजणी शुल्क न भरल्यामुळे  प्रलंबित पडले आहे. यामुळेच भूसंपादनाचे कामही लांबले आहे. शासनाने अडीच महिन्यांपूर्वी कामाची जबाबदारी वाटून दिली होती. 

जमीन मोजणीचे शुल्क विमानतळ प्रधिकारण मुंबईने भरावे असे सांगितले होते, परंतु अद्याप शुल्क न भरल्याने जमिनीची मोजणी झाली नसल्याचे उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी सांगितले. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे विस्तारीकरणात जमीन गेलेले शेतकरी संतप्त झाले आहेत. विमानतळ विस्तारीकरणासाठी विमानतळ प्रशासन मुंबईकडे जमीन भूसंपादनाचे काम सोपवले आहे. विस्तारीकरणासाठी 182 एकर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. तत्पूर्वी जमीन मोजण्यासाठी भूसंपादन विभागाकडे शुल्क भरण्याचे आदेश 22 नोव्हेंबर-2017 रोजी दिले आहेत. 

परंतु अडीच महिन्यांचा कालावधी उलटला तरी विमानतळ प्रशासन मुंबईने जमीन मोजण्याचे शुल्क भरले नसल्याने जमिनीची मोजणी झाली नाही. त्यामुळे ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी विस्तारीकरणात जात आहेत. त्यांचे भूसंपादनही होत नाही आणि त्याचा मोबदलाही मिळत नसल्याने शेतकर्‍यांत असंतोष पसरला आहे