होमपेज › Aurangabad › भाजपचे जिल्हा सरचिटणीस फत्तेलष्कर यांच्यावर हल्ला

भाजपचे जिल्हा सरचिटणीस फत्तेलष्कर यांच्यावर हल्ला

Published On: May 06 2018 8:05PM | Last Updated: May 06 2018 8:05PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

भाजपचे जिल्हा सरचिटणीस संजय फत्तेलष्कर यांच्यावर बेगमपुरा भागात हल्ला झाला आहे. विद्यापीठ परिसरात व्यायाम करून परत येत असताना  कारमध्ये आलेल्या चार ते पाच जणांनी फत्तेलष्कर यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून त्‍यांच्यावर तलवारीने हल्ला केला. या हल्‍ल्‍या ते गंभीर जखमी झाले आहेत. 

रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास विद्यापीठातील वसतिगृह दोन जवळ ही घटना घडली. हल्‍यानंतर त्‍यांना तात्‍काळ जवळच्या रूग्‍णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.