Tue, Feb 19, 2019 07:10होमपेज › Aurangabad › आठवलेंच्या सभेतील गोंधळ पूर्वनियोजितच

आठवलेंच्या सभेतील गोंधळ पूर्वनियोजितच

Published On: Jan 16 2018 2:07AM | Last Updated: Jan 16 2018 2:06AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांची सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु, या सभेत गोंधळ घातल्यामुळे आठवलेंना केवळ पाच मिनिटांत भाषण उरकते घ्यावे लागले. या सभेतील गोंधळ हा पूर्वनियोजितच होता. कार्यकर्ते व्यासपीठावर जाऊन धक्‍काबुक्‍की करण्याच्या तयारीत होते, अशी खळबळजनक माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी सोमवारी (दि. 15) दिली.  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त सर्वच नेत्यांना एक मंच असावा, अशी संकल्पना येथील तरुणांनी पुढे आणली. आठवले यांचा अपवाद वगळता सर्व दलित नेत्यांनी पाठिंबा देत त्यांनी कार्यक्रमात हजेरी लावली; परंतु या कार्यक्रमांकडे केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी येण्यास नकार दिला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्‍त करून कार्यक्रमात गोंधळ घातला. काही कार्यकर्त्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणी जाब विचारून विरोधी घोषणा दिल्या. त्यांच्या जोडीला इतर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी सभास्थानी खुर्च्यांची फेकाफेक केली होती. गोंधळातच आठवले यांना भाषण उरकते घ्यावे लागले होते. दरम्यान, आठवलेंची सभा उधळून लावल्यास मोठे महत्त्व प्राप्त होईल. समाजात त्यांच्याविरुद्ध मतप्रवाह वाहतील. आठवलेंना धक्‍काबुक्‍की करण्याचा तरुणांचा डाव होता, असे सूत्रांनी स्पष्ट केले. यामागील सूत्रधार कोण? याचीही सर्वांना माहिती असल्याचे बोलले जात आहे.