Mon, Nov 19, 2018 08:41होमपेज › Aurangabad › सहायक फौजदाराचीच कार चोरांनी भर रस्त्यावर फोडली

सहायक फौजदाराचीच कार चोरांनी भर रस्त्यावर फोडली

Published On: Apr 17 2018 1:54AM | Last Updated: Apr 17 2018 1:01AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

कारची काच फोडून चोरट्याने पैसे समजून वाहतूक शाखेच्या सहायक फौजदाराची बॅग लंपास केली. यात पावती बुक, शिक्के, अर्ज असे साहित्य होते. त्यामुळे वाहतुकीचे नियम तोडणार्‍याला देण्यात येणार्‍या पावत्याच चोरीला गेल्या आहेत. 14 एप्रिल रोजी भडकल गेट भागात हा प्रकार घडला.

धनाजी सुखदेव आढाव (48, रा. समर्थ रेसिडेन्सी, हर्सूल, जटवाडा रोड) हे वाहतूक शाखेत सहायक फौजदार आहेत. त्यांच्याकडे एटीएम, पावती पुस्तक, शिक्के व चौकशी अर्ज आदी साहित्य असते. हे सर्व साहित्य एका काळ्या रंगाच्या बॅगमध्ये ठेवून ती बॅग ते सोबत वापरतात. 14 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता ते कर्तव्यावर आले. भडकलगेट परिसरात कार उभी करून ते डॉ. आंबेडकर जयंती मिरवणुकीत बंदोबस्तासाठी गेले. चोरट्याला काचेतून कारमध्ये बॅग असल्याचे दिसले. पैसे असतील असे समजून त्याने चालकाच्या बाजूची काच फोडली आणि बॅग लंपास केली. दरम्यान, रात्री 11 वाजता आढाव कारजवळ आल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी सिटी चौक ठाणे गाठून कारची काच फोडून बॅग चोरीला गेल्याची तक्रार दिली.

Tags : Aurangabad, Assistant Fellows, car, burglars, road, thieves