Mon, Nov 19, 2018 00:09होमपेज › Aurangabad › पाच वर्षांपूर्वीच्या नियुक्‍तीला आता मंजुरी 

पाच वर्षांपूर्वीच्या नियुक्‍तीला आता मंजुरी 

Published On: May 21 2018 1:08AM | Last Updated: May 21 2018 12:04AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

टीव्ही सेंटर येथील व्यापारी संकुलाच्या कामासाठी मनपा प्रशासनाने पाच वर्षांपूर्वी परस्परच पीएमसीची नियुक्‍ती केली. त्यास स्थायी समितीची मंजुरी घेण्याचे टाळण्यात आले. मात्र आता पाच वर्षांनंतर मनपा प्रशासनाला त्याची आठवण आली आहे. पीएमसी नेमणुकीत स्थायी समितीची मंजुरी घेण्याचे अनवधानाने राहून गेले, असे सांगत कार्यकारी अभियंत्यांनी आता कार्योत्तर मंजुरीचा प्रस्ताव सादर केला आहे. 

मनपाच्या कामातील अनियमितता वारंवार समोर येत असतात. अशीच एक अनियमितात आता उघडकीस आली आहे. मनपाने सिडको टीव्ही सेंटर येथे 2013 साली व्यापारी संकूल बांधकाम आणि स्टेडियम विकासाचा प्रकल्प हाती घेतला. सुरुवातीला हा प्रकल्प 3 कोटी 77 लाख रुपयांचा होता. मात्र नंतर त्यात वाढ होऊन या प्रकल्पाची किंमत 4 कोटी 94 लाख रुपये इतकी झाली. या प्रस्तावावर आतापर्यंत पीएमसी कार्यरत असून त्यास कार्योत्तर मंजुरी द्यावी, असा प्रस्ताव आता कार्यकारी अभियंता कार्यालयाने सर्वसाधारण सभेसमोर आणला आहे. प्रस्तावात म्हटले आहे की, संबंधित पीएमसी 2013 सालापासून कार्यरत आहे. या समितीला त्यावेळी आयुक्‍तांच्या मंजुरीनुसार करण्यात आलेली आहे. 

मात्र त्यावेळी अनवधानाने त्यास स्थायी समितीची मंजुरी घेणे राहून गेले. प्रकल्प किमतीच्या दीड टक्के दराने या पीएमसीकडून काम करून घेण्यास कार्योत्तर मंजुरी द्यावी.