Thu, Jul 18, 2019 04:08होमपेज › Aurangabad › अवमानकारक वक्तव्यावरून संताप

अवमानकारक वक्तव्यावरून संताप

Published On: Feb 18 2018 1:55AM | Last Updated: Feb 17 2018 11:37PMपाटोदा :

येथेही सामाजिक संघटना, शिवभक्त यांनी छिंदम याचा पुतळा जाळत निषेध केला. तर, वडवणी, माजलगाव, गेवराई, केज, आष्टीसह इतर ठिकाणही श्रीपाद छिंदम याचा तीव्र निषेध केला. माजलगाव येथेही श्रीपाद छिंदमवर गुन्हा दाखल करण्याची मागणी संघटनांनी केली होती. 

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढणार्‍या नगरच्या श्रीपाद छिंदमचा पाटोद्यातील शिवप्रेमी नागरिकांनी त्याचा पुतळा जाळून निषेध केला. कायमची अद्दल घडावी, शिक्षा व्हावी अशी मागणी या वेळी नागरिकांच्या वतीने करण्यात आली. या वेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाबूराव जाधव, माजी सभापती संदीप जाधव, नगरसेवक बालाजी जाधव, अ‍ॅड. जब्बार पठाण, मुन्ना अन्सार, इम्रान शेख, नानासाहेब डिडूळ, युवराज जाधव, सुहास पाटील आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.

माजलगाव येथे पडसाद उमटले

माजलगाव : श्रीपाद छिंदम याने अवमानकारक भाषा वापरल्याचे पडसाद उमटले. याबाबत त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी   शेकाप, संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ यांच्यासह नागरिकांनी केली आहे. 

श्रीपाद छिंदमविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात यावा असे निवेदन पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांचेकडे देण्यात आली. शाहाजी सोळंके यांनी ही गुन्हा दाखल करण्याची फिर्याद ग्रामिण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मिर्झा वाहेद बेग यांच्याकडे दिली. यावेळी बहुजन विकास मोर्च्याचे प्रमुख बाबूराव पोटभरे, कचरू खळगे प्रशांत शेटे, एरंडे, श्रीहरी मोरे हे उपस्थित होते. पुन्हा दुसरी तक्रार शेकपाचे व मराठासेवा संघांच्या वतिने माजलगाव शहर व ग्रामिण पोलिसात दिली. यावर भाई अ‍ॅड. नारायण गोले पाटील, पुरुषोत्तम जाधव, रणजीत जाधव, कुंडलिक घाडगे, राजाभाऊ दळवी, केशव बादाडे, मनोज फरके, तुळशीराम रेडे, बब्रुवान पाष्टे, राहुल सुरवसे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

कठोरात कठोर शिक्षा करा

आष्टी : समाजाता दुफळी निर्माण करणार्‍यास कठोरात कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून अशी हिम्मत कोणी करणार नाही. अशांना वेळीच योग्य ती शिक्षा होणे गरजेचे असल्याचे आष्टीतील शिवप्रेमी संघटना आणि   वकील संघाने प्रसिद्धीस  दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

वकील संघाच्या वतीने तातडीची बैठक बोलावून निषेध नोंदविला गेला. यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. अविनाश निंबाळकर, अ‍ॅड. संग्राम गळगटे, अ‍ॅड.रियाज शेख यांच्यासह सर्व वकील संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. तर आष्टी पोलिस स्टेशनला देखील विविध संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी निवेदन देऊन निषेध नोंदविला. यावेळी राध्येशाम धस, महेश हंबर्डे,महेश शिंदे, अशोक चौधरी, सुनील रेडेकर, किशोर झरेकर, सचिन लोखंडे, तुषार काळे, सचिन तांगडे, अक्षय हळपावत, निलेश राऊत, पंकज सैगल, पप्पू पोठरे, दीपक साप्ते आदी उपस्थित होते.

युवासेनेचे जोडे मारो आंदोलन

बीड :   बीडमध्ये युवासेनेच्या वतीने शनिवारी श्रीपाद छिंदम याच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करीत पुतळा जाळला. यावेळी युवा सेनेच्या पदाधिकार्‍यांनी घोषणाबाजी करून श्रीपाद छिंदम याचा पुुतळा भरचौकात जाळला. यावेळी युवासेना जिल्हाधिकारी सुशिल पिंगळे, चंदू ठोंबरे, उल्हास सुस्कर, अतुल नवले, लखन जगताप, स्वप्नील पिंगळे, निखील पिंगळे, अमोल कोरडे, प्रदीप जाधव, दीपक घोडके, बाबा गुरखुदे, राहुल पाठक आदी उपस्थित होते.