होमपेज › Aurangabad › ‘भाईंनी माझी कारकीर्द संपविण्याचा विडाच उचलला होता’

‘भाईंनी माझी कारकीर्द संपविण्याचा विडाच उचलला होता’

Published On: Jun 09 2018 1:41PM | Last Updated: Jun 09 2018 1:40PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

रामदास कदम (भाई) यांनी मागील लोकसभा निवडणुकीत माझी राजकीय  कारकिर्द संपविण्याचा विडाच उचलला होता. त्यांनी मला पराभूत  करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला. त्यामुळे विरोधकांबरोबरच मला  स्वपक्षातील विरोधकांचाही सामना करावा लागल्याने ती निवडणूक  खूपच  जड गेली, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते तथा केंद्रीय अवजड उद्योगमंत्री  अनंत गिते यांनी औरंगाबादेत केला. 

आता भाई व माझ्यातील वादावर  पडदा पडला आहे, असे सांगत त्यांनी  या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करतानाच आगामी निवडणुकीत  अशी वेळ कुणावरही येऊ शकते, असा सल्लाही गिते यांनी शिवसैनिकांना  दिला. शुक्रवारी शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या 33 व्या वर्धापन  दिनानिमित्त येथील सिडको नाट्यगृहात आयोजित शिवसैनिकांच्या  मेळाव्यात ते मार्गदर्शन करीत होते. 

ते म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी सर्व निवडणुका स्वबळावर  लढविण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे निवडणुका जाहीर होताच पक्षांतर्गत  वाद, मतभेद सोडून द्या. सेनेत केवळ आदेश चालतो. पक्षप्रमुखांनी  दिलेल्या उमेदवाराला विजयी करा. आपल्याच पक्षाच्या उमेदवाराचे पाय  ओढू नका. त्याचा फटका पक्षालाच बसतो. याचा अनुभव मला स्वतःला  गेल्या लोकसभा निवडणुकीत आला आहे. पक्षांतर्गत विरोधामुळे मागील  लोकसभा निवडणूक मला सर्वाधिक कठीण गेली. त्या निवडणुकीत मी तटकरे विरुद्ध लढलो, शेकापचे जयंत पाटील यांच्या विरुद्ध लढलो.  विरोधकांचे ठीक आहे; परंतु त्याहीपेक्षा कठीण म्हणजे स्वपक्षातील मातब्बर  नेते रामदासभाई कदम यांच्या विरुद्धही मला लढावे लागले. त्यावेळी  रामदासभाईंनी मला पराभूत करून माझी राजकीय कारकीर्द संपविण्याचा
विडाच उचललेला होता. 

माझ्या पराभवासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. जंगजंग पछाडले.  दरवेळी लाख-दीड लाखाच्या मताधिक्याने जिंकणारा मी भाईंच्या विरोधामुळे   यावेळी केवळ एकवीसशे मतांनी निवडून आलो. आज मी केंद्रीय मंत्री आहे.  मात्र, आधी मी शिवसेनाप्रमुखांनी घडविलेला सच्चा शिवसैनिक आहे. 

आणि एक शिवसैनिक म्हणूनच मी तुम्हाला बोलत आहे. या निवडणुकीत माझ्यासारखी वेळ कुणावरही येऊ शकते. त्यामुळे तयार रहा. तसेच आपापसातील मतभेद विसरा, पक्षाने आदेश देताच कामाला लागा आणि राज्यात स्वबळावर भगवा फडकवा, असे आवाहनही गिते यांनी केले. 

आता आमचे मतभेद मिटले

शिवसेना नेते तथा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याबाबत केलेल्या गौप्यस्फोटानंतर अनंत गिते यांनी लगेच आता रामदासभाई आणि माझ्यातील मतभेद संपुष्टात आलेले आहेत. माझ्या विजयानंतर कदम यांनी मला प्रत्यक्ष भेटून दिलगिरी व्यक्त केली होती. तेव्हा त्यांच्या मुलाला दापोलीतून आमदार करायचे होते. त्यांनी माझी राजकीय कारकीर्द संपविण्याची शपथ घेतली होती; परंतु मी त्यांच्या मुलाला आमदार करण्याची त्यावेळी शपथ घेतली, तेव्हाच या वादावर पडदा पडला, असे सांगत गिते यांनी त्या वादावर तत्काळ पडदा पोलिसाच्या अपघाती टाकण्याचा प्रयत्न केला