Tue, Jan 22, 2019 22:21होमपेज › Aurangabad › विद्यापीठ दस्तावेजासाठी स्वतंत्र इमारत

विद्यापीठ दस्तावेजासाठी स्वतंत्र इमारत

Published On: Jan 18 2018 1:59AM | Last Updated: Jan 18 2018 1:59AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

विद्यापीठाचे विविध विभाग आणि कार्यालयांचे दस्तावेज सुरक्षित ठेवण्यासाठी परीक्षा विभागाच्या समोरील जागेत स्वतंत्र इमारत बांधण्यात येत आहे़  या इमारतीसाठी 23 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी बुधवारी सांगितले. 

डॉ़  बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शैक्षणिक आणि कार्यालयीन असे 50 हून अधिक विभाग आहेत. त्यांचे दस्तावेज सुरक्षित ठेवणे आवश्यक असते. परीक्षा विभागासमोरील इमारतीत दस्तावेजासाठी व्यवस्था आहे. तथापि, ती पुरेशी नसल्यामुळे नव्या स्वतंत्र इमारतीची गरज भासू लागली होती. विद्यापीठ लवकरच नॅकला सामोरे जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर दस्तावेजासाठी स्वतंत्र इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्याच्या रेकॉर्ड रूमच्या बाजूलाच नवी स्वतंत्र इमारत उभारण्यात येत आहे़  इमारतीसाठी पायाचे खोदकाम सुरूही झाले आहे. विद्यापीठाचा बांधकाम विभाग हेे काम करत आहे़  सहा महिन्यांत इमारत तयार होईल यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे़