होमपेज › Aurangabad › राज ठाकरेंच्या सुनेचे ‘अंबाजोगाई’ कनेक्शन

राज ठाकरेंच्या सुनेचे ‘अंबाजोगाई’ कनेक्शन

Published On: Dec 12 2017 11:36AM | Last Updated: Dec 12 2017 11:57AM

बुकमार्क करा

अंबाजोगाई : प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि त्यांची मैत्रिण मिताली बोरुडेचा साखरपुडा मुंबई येथे संपन्न झाला. अमित आणि मिताली यांचा लवकरच विवाह होणार आहे. मिताली यांचे  अंबाजोगाईशी थेट कनेक्शन आहे. बीड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते नंदकिशोर  मुंदडा  आणि स्व. विमल यांचा मुलगा अक्षय मुंदडा यांच्या पत्नी नमिता  मुंदडा यांच्याशी मिताली यांचे अगदी जवळचे नाते आहे. नमिता अक्षय मुंदडा यांचे सख्खे मोठे मामा डॉ. संजय बोरुडे यांची मिताली या कन्या  आहेत. डॉ. संजय बोरुडे हे मुंबईतील नामांकित बेरिएट्रिक सर्जन आहेत. त्यांना मिताली आणि राहुल अशी दोन अपत्ये आहेत. त्यांपैकी मिताली या  व्यवसायाने फॅशन डिझायनर आहे. डॉ. संजय बोरुडे आणि राज ठाकरे यांच्यात अतिशय मैत्रीचे संबंध असून आता ते नात्यात बदले आहे. 

अक्षय आणि नमिता यांचा साखरपुडा आणि विवाहानंतरचे रिसेप्शन  मुंबईतच झाले होते. यावेळी मिताली बोरुडे यांच्या समवेत  राज ठाकरे स्वतः आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या दोन्ही कार्यक्रमात पूर्णवेळ उपस्थिती लावली होती. एवढेच नव्हे तर कार्यक्रमाच्या नियोजनातही ठाकरे कुटुंबियांचा सहभाग होता अशी माहिती अक्षय मुंदडा यांनी दिली. अक्षय आणि नमिता यांच्या विवाहाच्या दिवशी परीक्षा चालू असल्याने मिताली  यांना त्यावेळी उपस्थित राहता आले नव्हते. विवाहानंतर मिताली या  अमित ठाकरे यांच्यासोबत अंबाजोगाईला येणार असल्याचे अक्षय मुंदडा यांनी सांगितले

नमिता आणि मिताली यांच्यात लहानपणापासूनच चांगलीच  गट्टी आहे. नात्याने बहिणी तर आहेतच, परंतु त्यांच्यात मैत्रीचेही घट्ट नाते आहे. नेहमी हसतमुख असणारी मिताली सर्वांशीच आपलेपणाने वागते, बहीण आणि मैत्रीण या दोन्ही रोलमध्ये ती परफेक्ट असल्याचे नमिता मुंदडा यांनी सांगितले.
 

संबंधित बातमी :

See Pics : अमित ठाकरे -मिताली यांचा