Thu, Apr 25, 2019 03:27होमपेज › Aurangabad › शिवसेना सोबत नव्‍हतीच कधी : राम शिंदे

शिवसेना सोबत नव्‍हतीच कधी : राम शिंदे

Published On: Jan 29 2018 1:42AM | Last Updated: Jan 29 2018 1:42AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

2014 ची निवडणूक भाजपने स्वतंत्रपणे लढली आणि सर्वाधिक जागा जिंकल्या. कधी नव्हे ते भाजपचे देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री झाले आहे. सत्ता स्थापन करताना शिवसेना विरोधी पक्षातच होती. तसेच कळत-नकळत शिवसेना आमच्यासोबत आली तरीही गेल्या साडेतीन वषार्र्ंत त्यांनी विरोधी पक्ष म्हणूनच भूमिका साकारली. शिवसेना आमच्या मागे तसेच आमच्यासोबतही नव्हती, त्यामुळे 2019 च्या निवडणुकीत सोबत आले तर साथ घेऊ अन्यथा त्यांना सोडून पुढे जाऊ, असे जलसंधारण व राज्य शिष्टाचारमंत्री राम शिंदे यांनी पत्रकारांशी रविवारी सांगितले.

गुणीजन साहित्य संमेलनाला सदिच्छा भेट देण्यासाठी राम शिंदे रविवारी शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना शिवसेनेला हा टोला लगावला. तसेच त्यांनी भीमा- कोरेगाव प्रकरणासंदर्भात बोलताना समाजकंटकांच्या माध्यमातून अशा घटना घडतात; पण सर्व परिस्थिती गृहखात्याने योग्य प्रकारे संवेदनशीलपणे हाताळली. त्यामुळे मुख्यमंत्री एक प्रभावीपणे गृहखातेही सांभाळत आहे, असे त्यांनी सांगितले. 

नाथाभाऊंनी त्यांच्या व्यथा मांडल्या

नाथाभाऊंनी प्रतिकूल परिस्थितीत भाजपला उभे करण्याचे काम केले आहे. ते जे बोलले आहे त्यांचा विषय वरिष्ठ पातळीवर हाताळून चर्चा करून प्रश्‍न निकालात काढू. कारण नाथाभाऊ जे बोलले ती त्यांची तळमळ आहे, त्यांच्या व्यथा त्यांनी मांडल्या आहेत, असे सांगत शिंदे यांनी एकनाथ खडसे यांनी केलेल्या वक्तव्यावर सारवासारव केली.