Sat, Mar 23, 2019 12:05होमपेज › Aurangabad › शिवसेना; तुम्ही नाराज की आनंदी आहात, हेच कळत नाही : अजित पवार

"शिवसेना, तुम्ही नाराज की आनंदी आहात? हेच कळत नाही"

Published On: Dec 22 2017 11:33AM | Last Updated: Dec 22 2017 11:33AM

बुकमार्क करा

नागपूर : विशेष प्रतिनिधी

राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा  पुरता बोजवारा उडाला असून गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. राष्ट्रीय गुन्हे ब्युरोने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात गुन्हेगारी, बलात्कार आणि सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणावर वाढले असून या गुन्ह्यांत महाराष्ट्र तिसर्‍या क्रमांकावर आला ही बाब चिंताजनक  असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे  गटनेते अजित पवार यांनी गुरुवारी विधानसभेत केली.

विरोधी पक्षाच्या वतीने विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात  आला. या प्रस्तावावरील चर्चेत बोलताना अजित पवार यांनी, सरकारवर जोरदार टीकास्त्र डागले. ते म्हणाले, गुन्हेगारीत उत्तर प्रदेश, बिहार यासारखी राज्ये पहिल्या आणि दुसर्‍या क्रमांकावर आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्राचा नंबर आहे. पोलिसांचा आता गुन्हेगारांवर वचक  राहिलेला नाही. त्यामुळे गुन्ह्यात मोठ्याप्रमाणावर वाढ झाली आहे. पोलिसांच्या कामात मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप वाढल्याचा आरोपही त्यांनी केला. 

त्यांनी शिवसेनेच्या आमदारांनाही चिमटे काढले, शिवसेनेचे सदस्य बसलेल्या बाकाकडे पहात ते म्हणाले, तुमचे  तर काहीच कळत नाही. तुम्ही नाराज आहात का, आनंदी आहात? सरकारसोबत आहात की नाही? असेही ते म्हणाले.