Wed, Nov 21, 2018 15:31होमपेज › Aurangabad › अजित पवार, मुंडे, प्रदीप जैस्वालांच्या घरी

अजित पवार, मुंडे, प्रदीप जैस्वालांच्या घरी

Published On: Feb 04 2018 1:50AM | Last Updated: Feb 04 2018 1:38AMऔरंगाबाद  : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांनी शनिवारी शिवसेनेचे माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले. 

जैस्वाल यांच्या पत्नीचे नुकतेच निधन झाले. या पार्श्‍वभूमीवर हे दोन्ही नेते सायंकाळी जैस्वाल यांच्या घरी पोहचले. त्यांच्या सोबत आमदार सतीश चव्हाण, आमदार अमरसिंह पंडित आणि काही स्थानिक पदाधिकारीही होते. या भेटीदरम्यान शिवसेनेचे शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांचीही उपस्थिती होती. 

राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चा आटोपताच अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी जैस्वाल यांचे घर गाठले. त्यांनी जैस्वाल यांचे सांत्वन केले. तसेच त्यांच्याशी सुमारे अर्धा तास चर्चा केली.

प्रदीप जैस्वाल हे सध्या शिवसेनेचे महानगरप्रमुख आहेत. ते याआधी खासदार, आमदारही राहिलेले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर या भेटीकडे राजकीय दृष्टिकोनातूनही बघितले जात आहे.