Thu, Nov 22, 2018 01:29होमपेज › Aurangabad › एअर इंडियाच्या कार्यालातील संगणक जळाले

एअर इंडियाच्या कार्यालातील संगणक जळाले

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

जालना रोडस्थित एअर इंडियाच्या कार्यालयातील संगणक प्रणाली विद्युत प्रवाहाच्या उच्च दाबामुळे मुख्य संगणकांसह सुमारे चार संगणक व इतर प्रणाली जळाली. ही घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. या घटनेमुळे येथील कार्यालयाची दिल्लीस असलेली कनेक्टिव्हिटी तुटल्याने कार्यालयीन कामकाज ठप्प झाले होते. यामुळे प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी विमानतळावर धाव घ्यावी लागली. ही यंत्रणा पूर्ववत होण्यासाठी शनिवारचा पूर्ण दिवस लागेल अशी माहिती व्यवस्थापक रमेश नंदेय यांनी दिली. 

दुपारी दोनच्या सुमारास अचानक विजेचा दाब वाढल्याने दिल्ली येथील सर्व्हरशी कनेक्ट असलेले संगणक प्रथम जळाले. त्यानंतर लागोपाठ कार्यालयात असलेले चार संगणक अचानक बंद पडले. यामुळे पूर्ण कामकाज ठप्प पडले. याच दरम्यान  अनेक प्रवासी दिल्ली, मुंबईचे तिकीट काढण्यासाठी कार्यालयात आले होते, परंतु ही घटना अचानक घडल्याने त्यांना तिकिटासाठी व इतर कामांसाठी विमानतळ गाठावे लागले. या कामी कार्यालयातील कर्मचार्‍यांनी मदत केली, परंतु या घटनेमुळे अनेकांना धावपळ करावी लागली.