Thu, May 23, 2019 14:41
    ब्रेकिंग    होमपेज › Aurangabad › आधी प्रेयसीने प्रियकराला झोडपले, नंतर ‘त्याच्या’ पत्नीने ‘तिला’ धुतले

आधी प्रेयसीने प्रियकराला झोडपले, नंतर ‘त्याच्या’ पत्नीने ‘तिला’ धुतले

Published On: Apr 11 2018 1:34AM | Last Updated: Apr 11 2018 12:50AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

पत्नीशी बेबनाव झाल्यानंतर वेगळे राहणार्‍या शिकाऊ डॉक्टरच्या आयुष्यात प्रेयसी आली. ‘तिने’ त्याच्याकडे लग्‍नासाठी तगादा लावला. पण, ‘तो’ लग्‍नाला नकार देत होता. त्यामुळे ‘तिने’ चिडून त्याच्या कानशिलात लगावली. प्रेयसीचा हा रुद्रावतार बघून त्याने तिला धडा शिकविण्याचे ठरविले अन् हा सर्व प्रकार पत्नीला सांगितला. त्यानंतर दोघींना पोलिस ठाण्यात बोलावून समोरासमोर आणले. त्यानंतर त्याच्या पत्नीसह सासूने प्रेयसीला ठाण्यातच धुतले. सोमवारी दुपारी सिडको ठाण्यात हा गोंधळ झाला. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. 

इफ्तेकार निसार पठाण व चार महिलांचा आरोपींमध्ये समावेश आहे. या प्रकरणी पोलिस नाईक प्रकाश गणेश डोंगरे यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की, जिन्सी भागातील एका रुग्णालयात इफ्तेकार निसार पठाण हा शिकाऊ डॉक्टर आहे. दोन वर्षांपूर्वी पत्नीशी बेबनाव झाल्याने तो वेगळा राहतो. दरम्यान, रुग्णालयातील परिचारिकेसोबतच पठाणचे प्रेमप्रकरण सुरू झाले. पठाण विभक्‍त राहत असल्याचे पाहून प्रेयसीने त्याच्याकडे लग्‍नाचा तगादा लावला. मात्र, पठाण तिला लग्‍न करायला नकार देत होता. याचा राग आल्याने सोमवारी प्रेयसीने रुग्णालय गाठले. पठाण रुग्णालयाबाहेर येताच त्याच्या कानशिलात लगावून प्रेयसी निघून गेली. त्यानंतर चिडलेल्या पठाणने प्रेयसीला धडा शिकविण्यासाठी पत्नीला घटनेची माहिती दिली.

तिला प्रेयसीने कानशिलात लगावल्याचे सांगत सिडको पोलिस ठाण्यात बोलावले. तर, दुसरीकडे प्रेयसीला आपली पत्नी मारहाण केल्यावरून तुझ्याविरोधात सिडको पोलिस ठाण्यात तक्रार देत असल्याचे सांगितले. त्यामुळे या दोघीही पोलिस ठाण्यात समोरासमोर आल्या. याशिवाय पठाणची सासू आणि मेहुणीदेखील तेथे आली. तिघींनी पठाणच्या प्रेयसीला चांगलेच झोडपून काढले. यावेळी पठाणदेखील त्यांच्या भांडणात सहभागी झाला. बराचवेळ गोंधळ सुरू असल्याचे पाहून पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण, चौघेही ऐकत नसल्याचे पाहून पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. या प्रकरणाचा अधिक तपास हवालदार सुधाकर पाटील करीत आहेत. 

Tags : Aurangabad, After, being, unaware, wife, learner, different, page,  become, beloved. '