Sat, Sep 22, 2018 07:25होमपेज › Aurangabad › व्यवस्थापकाने केला १२ लाखांचा अपहार

व्यवस्थापकाने केला १२ लाखांचा अपहार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

एका डिस्ट्रिब्युटर्सकडे कामाला असलेल्या व्यवस्थापकाने साहित्य विक्री करून आणि परस्पर बँकेतून पैसे काढून तब्बल 11 लाख 89 हजार रुपयांचा अपहार केला. याप्रकरणी व्यवस्थापकाविरुद्ध सोमवारी (दि. 27) हर्सूल ठाण्यात अपहार केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली. 

याडाराम श्रीनिवास गौड (रा. पेद्दा गुंडवेल्ली, ता. दुबाका, जि. सिद्दीपेठ, तेलंगणा) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी सांगितले की, नारायण नरसैय्या गौड हे मेसर्स निर्मल ट्रेडर्स पेप्सी डिस्ट्रिब्युटर्स एजन्सी चालवितात. तेथे याडाराम हा 2012 पासून व्यवस्थापक म्हणून कामाला होता. त्याने सप्टेंबर 2012 ते सप्टेंबर 2017 दरम्यान पेप्सीचे कॅरेट, फ्रीज, टीव्ही आदी साहित्यांची परस्पर विक्री केली. ही बाब नारायण गौड यांना समजल्यानंतर त्यांनी याबाबत त्याला जाब विचारला. तसेच बँकखात्याची अधिक माहिती घेतल्यानंतर त्याने परस्पर 80 हजार काढल्याचेही समोर आले. दरम्यान, याडाराम याने एकूण 11 लाख 89 हजारांचा अपहार केल्याची तक्रार नारायण गौड यांनी हर्सूल ठाण्यात दिली. तपास उपनिरीक्षक डी. के. बनकर करीत आहेत.