Thu, Jun 27, 2019 15:44होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : अतिरिक्त मनपा आयुक्तांच्या श्रीमुखात भडकावली (video)

औरंगाबाद : अतिरिक्त मनपा आयुक्तांच्या श्रीमुखात भडकावली (video)

Published On: Jun 22 2018 11:00AM | Last Updated: Jun 22 2018 1:05PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

पाण्याचा अंदाज न आल्याने बुलेट दुचाकीसह नाल्यात पडून एकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री पाऊस सुरू असताना आविष्कार कॉलनीत घडली. चेतन रत्नाकर चोपडे (३८, रा. टेलिकॉम हौसिंग सोसायटी, एन-६, सिडको) असे मृताचे नाव आहे) या प्रकरणी सिडको ठाण्यात नोंद असून अधिक तपास हवालदार ढगे करीत आहेत.

विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच जय भवानी चौकात नाल्यात पडल्याने मजुरांचा मृत्यू झाला होता. या दरम्यान, मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग हे पाहणी करण्यासाठी गेले असता संतप्त नागरिकांनी त्यांच्या श्रीमुखात भडकावली. मनपातील अधिकारी पाहणी करण्यासाठी गेले होते तेव्‍हा हा प्रकार घडला. सिडकोतील प्रकार एन 6 भागात गुरुवारी रात्री नाल्यात बुडुन  तरुणाचा मृत्यु झाला सकाळी मनपा अधिकारी पाहणी करण्यासाठी गेले होते तेव्हा हा प्रकार घडला.