Sun, Jul 21, 2019 01:55होमपेज › Aurangabad › कुलगुरुंच्या घोषणेनंतरही ‘आचार्य’ पदवीत घोळ

कुलगुरुंच्या घोषणेनंतरही ‘आचार्य’ पदवीत घोळ

Published On: Feb 18 2018 1:55AM | Last Updated: Feb 17 2018 11:12PMपरभणी : प्रतिनिधी

येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील मृद व कृषी रसायनशास्त्र विषयातील सहयोगी प्राध्यापक पदाकरिता देण्यात आलेल्या जाहिरातीतील अटीनुसार त्याच  विषयातील आचार्य पदवी अत्यावश्यक आहे, मात्र अशी पात्रता नसलेले उमेदवार डॉ.महेश शरदराव देशमुख यांना सदरील पदासाठी पात्र ठरविण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत सहायक प्राध्यापक डॉ. गणेश गायकवाड हे सात महिन्यांपासून विद्यापीठ प्रशासन, एम.सी.ए.आर.पुणे, तसेच राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करीत आहेत.

सदरील बाब डॉ.गायकवाड यांनी कुलगुरू डॉ.व्यंकटेश्‍वरलू यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी ही पदवी अपात्र ठरविली, पण विद्यापीठाच्या सर्व शैक्षणिक बाबीचे मुख्य डॉ.विलास पाटील यांनी या प्रकरणी डोळेझाक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत पोर्टलवर शासनाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर याप्रकरणी योग्य ती चौकशीचे आदेश राज्याचे कार्यासन अधिकारी भारती दी.धुरी यांनी कुलगुरूंना दिले आहेत.   नियमांचे उल्लंघन करणार्‍या संबंधित अधिकारी, संचालकांवर कडक कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.