Thu, Apr 25, 2019 14:08होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन अटकेत

औरंगाबाद : एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन अटकेत

Published On: May 22 2018 11:28PM | Last Updated: May 22 2018 11:28PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

वंदे मातरम प्रकरणावरून महापालिकेत गोंधळ घातल्याच्या प्रकरणात सिटी चौक पोलिसांनी एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन याला मंगळवारी रात्री अटक केली. दंगल प्रकरणातही त्याचे नाव समोर आले होते, मात्र दंगलीच्या कार्यकाळात तो शहरात नसल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी जुन्या गुन्ह्यात त्याच्या मुसक्या आवळल्या. 

महापालिकेत गोंधळ घातल्यावर मनपा सुरक्षा रक्षकांनी दिलेल्या तक्रारीवरून मतीन याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. गु.र.न. 302/2017 असा होता. सहायक फौजदार हरीश खटावकर अधिक तपास करीत होते. त्यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या पथकाने मंगळवारी रात्री मनपा समोरील मतीनच्या कार्यालयासमोरून त्याला ताब्यात घेतले. उशिरापर्यंत अटकेची कारवाई सुरू होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Tags : aurangabad, sayyad matin, AIMIM,