Sat, Mar 23, 2019 18:56होमपेज › Aurangabad › अत्याचाराविरुद्ध शहरात संतापाची लाट

अत्याचाराविरुद्ध शहरात संतापाची लाट

Published On: Apr 18 2018 1:42AM | Last Updated: Apr 18 2018 12:48AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

जम्मू येथील कठुआ जिल्ह्यात 8 वर्षीय बालिकेवर अमानुषपणे अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेच्या तसेच उन्नाव व देशातील इतर भागात मुलींवर होत असलेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ मंगळवारी विभागीय आयुक्‍त कार्यालयासमोर सर्वधर्मीय व सर्वपक्षीय महाधरणे आंदोलन झाले. 

महाराष्ट्र मुस्लिम अवामी कमिटीतर्फे आयोजित या महाधरणे आंदोलनात आंबेडकरी विचारवंत प्रा. डॉ. सुषमा अंधारे, सामाजिक कार्यकर्ते प्रा. हनुमंतराव पवार, जमात ए इस्लाम ए हिंदचे अध्यक्ष वाजेद काद्री यांनी आपले विचार मांडले. आंदोलनात आ. इम्तियाज जलील, मनमोहनसिंग ओबेरॉय, इलियास किरमाणी, डॉ. जितेंद्र देहाडे, खालिद सफिउद्दीन, ऐजाज झैदी, नासेर नाहदी, मो. अब्दुल रउफ, अ‍ॅड. सय्यद अक्रम, राजकुमार जाधव आदी सहभागी झाले होते. बलात्काराच्या घटनांमधील आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने विभागीय आयुक्‍तांना दिले. 

Tags : Aurangabad,  wave, fury,  city, against, oppression