Tue, Jul 07, 2020 06:22होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : कन्नड येथील मायलेक कोरोनामुक्त

औरंगाबाद : कन्नड येथील मायलेक कोरोनामुक्त

Last Updated: May 27 2020 2:57PM
कन्नड : पुढारी वृत्तसेवा 

तालुक्यातील देवळाना येथे २६ वर्षीय महिलेसह अडीच वर्षीय मुलीला कोरोना सारख्या संसर्गजन्य आजाराची लागण झाली होती. या दोन्ही माय लेकीचा अहवाल हा १० दिवस अगोदर पॉझिटिव्ह आला होता. या माय लेकींवर कन्नड ग्रामीण रुग्णालय आयसोलेशन येथे उपचार सुरु होते. त्यांचा अहवाल आता निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे मायलेकींचा सत्कार करून सुट्टी देण्यात आली.

तालुक्यातील देवळाना येथील माय लेकींचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आल्याने कन्नड तालुक्यातील ग्रामीण भागात प्रथमच कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण झाले होते. त्या माय लेकींवरती कन्नड ग्रामीण रुग्णालयाच्या आयसोलेशनमध्ये उपचार सुरु होते. १० दिवस त्यांच्यावर उपचारनंतर अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून आज सुट्टी देण्यात आली. 

औरंगाबादेतील कोरोना मृत्यूचे सत्र सुरूच, कोरोनाचा ६२ वा बळी 

कन्नड सारख्या ग्रामीण भागात कोरोनासारख्या महाभयंकर आजारावर उपचार झाल्याने रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी यांचे कौतुक करण्यात येत आहे. यावेळी देवळाना येथील माय लेकींचा सत्कार तालुक्यांचे आमदार उदयसिंग राजपूत, उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, तहसीलदार संजय वारकड, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश सातव, पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे, मुख्याधिकारी नंदा गायकवाड़, वैद्यकीय अधीक्षक डॉ.दत्ता देवगावकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पवार यांनी केला. यावेळी कोरोना मुक्त झालेल्या २६ वर्षीय महिला व तिची अडीच वर्षाची मुलगी यांच्यावर पुष्पवर्ष्टी, व टाळ्या वाजून निरोप देण्यात आला. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी, पोलिस कर्मचारी, नगरपरिषद कर्मचारी अधिकारी आदिसह नागरीक उपस्थित होते. 

औरंगाबादेत २२ कोरोना रुग्णांची भार 

तालुक्यात देवळणा पाठोपाठ धनगरवाडी येथील दोन रुग्णाचे आहवाल पोझिटिव्ह आले होते. यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णाची संख्या चार झाली होती. त्यातील आता दोघे कोरोनामुक्त झाल्याने तालुक्यातील नागरिकांतील कोरोना विषयीची भीती कमी झाली आहे. तर आई सह अडीच वर्षाच्या मुलीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने तर त्यांना घरी सोडल्याने देवळणा गावातील व परिसरतील लोकांनी आनंद व्यक्त केला आहे. तर ग्रामस्थांनी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पोलिस, महसूल या विभागाचे आभार मानले आहेत. तालुक्यातील प्रथम कोरोना रूग्ण बरा झाल्याने इतर दूसऱ्या रुग्णाना या आजाराशी लढण्यासाठी बळ मिळेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.