Sun, Dec 08, 2019 19:52होमपेज › Aurangabad › जोरदार पावसाने अंजना पळशी प्रकल्पात ५ टक्के जलसाठा

जोरदार पावसाने अंजना पळशी प्रकल्पात ५ टक्के जलसाठा

Published On: Jul 22 2019 1:01PM | Last Updated: Jul 22 2019 1:01PM
पिशोर : प्रतिनिधी  

कन्नड तालुक्यात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने अंजना नदीसह अनेक नाले भरभरून वाहिल्याने अंजना पळशी प्रकल्पात ५ टक्के जलसाठा जमा झाला आहे. यामुळे पिशोर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

कन्नडसह सिल्लोड तालुक्यातील अनेक गावांना पाणी पुरवठा करणारा अंजना प्रकल्प अनेक महिन्यांपासून कोरडा ठाक होता. मागील वर्षी पावसाने दडी मारलेल्या आणि थोड्या प्रमाणात पडलेल्या पावसाने काही महिने पिण्या इतकेच पाणी पिशोर येथील परिसरात उपलब्ध झाले होते. परंतु एप्रिल महिन्यातच पिशोरमध्ये पाणी- बानी होण्याचे संकेत जाणवले होते. पण कसेबसे दोन महिने उलटल्यावर पावसाळा सुरू झाला. 

यानंतर जुलै महिन्यात पावसाची सुरूवात चांगली झाली. त्यातच शनिवारी दि.२० रोजी परिसरात मुसळधार पाऊस होऊन गेला. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने शेतकरी नाराज झाले. अनेक जणांचे घरांचे नुकसान झाले पण अंजना प्रकल्पात ५ टक्के पाणीसाठा जमा  झाला.