Tue, Jul 07, 2020 20:06होमपेज › Aurangabad › मराठवाड्यात 48 तासांत पाऊस हवामान खात्याचा इशारा

मराठवाड्यात 48 तासांत पाऊस हवामान खात्याचा इशारा

Published On: Dec 06 2017 1:58AM | Last Updated: Dec 06 2017 1:49AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

ओखी वादळाचा परिणाम गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यातही दिसून येत आहे. मंगळवारी क्‍वचितच सूर्यदर्शन झाले असून येत्या 48 तासांत मराठवाड्यातही पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 

दक्षिणेत ओखी चक्रीवादळाने हाहाकार उडवला असून हे वादळी आता अरबी समुद्रात धडकले आहे. ओखी चक्रीवादळामुळे मुंबईसह उत्तर महाराष्ट्रातील वातावरण बदलले आहे. पारा घसरल्याने थंडीचा कडाका वाढला असून, अवकाळी पावसानेही मुंबई, नाशिकसह अनेक भागांना झोडपून काढले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांतील वातावरण बदलले आहे. दोन दिवसांपासून मराठवाड्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. गार वारे वाहू लागल्याने थंडी वाढली आहे. हा गारवा दिवसाही जाणवत आहे. गारवा वाढल्याने दिवसाही ऊबदार कपडे घालूनच बाहेर पडावे लागत आहे. मंगळवारी दुपारी शहरासह मराठवाड्यात अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस पडला. 

ढगाळ वातावरणामुळे सायंकाळी पाच वाजेपर्यंत अंधुक वातावरण होते. मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता नाही, मात्र काही ठिकाणी तुरळक सरी तसेच हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. ही परिस्थिती आणखी काही दिवस राहील, अशी माहिती विभागीय आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अतुल पारगावकर यांनी दिली.